आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब...५८० शाळाबाह्य बालक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चांदूर रेल्वे तालुक्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करताना प्रगणक.)
अमरावती- प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ५८० शाळाबाह्य बालक आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात १५५ तर ग्रामीण भागात ४२५ शाळाबाह्य बालक असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. यामध्ये मुले मुलींचे समप्रमाण असल्याचे वास्तवदेखील उघड झाले आहे. शासन आदेशानुसार राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे या बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागात तर महापालिका शिक्षण विभागाकडून महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील माहिती रविवारी तर महापालिका क्षेत्रातील माहिती सोमवारी संकलित करण्यात आली. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य बालक आढळून आले आहे. तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक बाब असून, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात १५५ तर अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागात ४२ असे १९७ शाळाबाह्य बालक असल्याचे समोर आले. सर्व शासकीय विभागांचे मुख्यालय असलेले अमरावती शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात शाळाबाह्य बालकांचे प्रमाण सर्वाधिक अाहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात शैक्षणिक सुविधा, शाळांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यानंतरदेखील शाळाबाह्य बालकांचे प्रमाण अधिक आढळून आल्याने आर्थिक-सामाजिक विषमतादेखील याला कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवार, जुलै रोजी एकाच दिवशी अभियान राबवण्यात आल्याने शाळाबाह्य बालकांची स्थिती लक्षात येण्यास मदत झाली आहे.
एक महिन्याच्या आत शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले आहे. एकही बालक शाळाबाह्य राहू नये, याची खबरदारी खुद्द शासनाने घेतली आहे. राज्यात एकाच दिवशी शाळाबाह्य बालक शोधमोहीम राबवण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले. शिक्षण विभागावर या सर्वेक्षणाची प्रमुख जबाबदारी टाकण्यात आली होती. सर्वच विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत नेमून दिलेला संपूर्ण परिसर कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. कॉलनी असो की गलिच्छ वस्ती अादी सर्व ठिकाणी मोहीम राबवली.

शाळाबाह्य बालक
तालुकामुले मुली एकूण
अचलपूर ३१ ११ ४२
अमरावती (ग्रा.) २४ १८ ४२
अंजनगाव सुर्जी १८ १३ ३१
भातकुली
चांदूर बाजार ३२ ४८ ८०
चिखलदरा २० २५
चांदूर रेल्वे
दर्यापूर १६
धारणी ३१ ३१ ६२
धामणगाव रेल्वे ११
मोर्शी ३५ २१ ५६
नांदगाव खंडे. १२ १९
तिवसा
वरुड १० १७
अमरावती(मनपा) - - १५५
एकूण २२४ २०१ ५८०