आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागात पाऊस थांबला; २४ तासांमध्ये दोन मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गेल्यापाच दिवसांपासून अमरावती विभागात सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी संपुर्णत: विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. पावसाची संततधार गुरूवारीच थांबली होती मात्र विभागातील काही जिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरू होता. शुक्रवारी मात्र विभागात सुरू असलेला रिमझीम पाउस सुद्धा बंद झाला. त्यामुळे मुळे मागील पाच ते सहा दिवस विस्कळीत झालेले शहरातील जनजीवन पुर्वपदावर आले. मागील २४ तासांत अमरावती विभागात झालेल्या पावसात सर्वाधिक ११.३ मिमी पावसाची नोंद अकोला जिल्ह्यात केली आहे.
तर त्या खालोखाल वाशीम जिल्ह्यात मिमी पाऊस झाला. अमरावतीत ३.७ मिमी बुलडाणा २.८ मिमी आणि यवतमाळ जिल्ह्यात ४.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद केली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातून दिली आहे. गेल्या २४ तासात घडलेल्या घटनांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मलकापुर (बुद्रूक) येथील एका २७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातील दादूलगाव येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली अाहे, अशी माहिती विभागीय नियंत्रण कक्षाने दिली. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथे ९५ , यवतमाळ मध्ये १९, आणि नेर परसोपंत येथे २३१ घरांची अंशत पडझड झाली आहे.
२.८
वाशीम
बुलडाणा
यवतमाळ
अमरावती
अकोला
३.७
११.३
४.२
७.०
७९८.७
६६७.८
९११.३
६९७.३
२६८.८
४७८.२
२२२.०
३४२.४
२९३.५
४०४.८
३४२.०
४७०.८
४५५.२
५१०.७
८१४.५
यवतमाळ
वाशीम
बुलडाणा
अकोला
सरासरी अपेक्षीत प्रत्यक्ष झालेला मागील वर्षी झालेला
अमरावती
ऑगस्टला पडलेला
आतापर्यंतची टक्केवारी
अमरावतीत शेतीचे नुकसान
मागीलचार ते पाच दिवसांमध्ये झालेल्या जोरदास पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील हजार ८०० हेक्टर वरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अमरावती तालुक्यामध्ये १०७४ हेक्टर, मोर्शी तालुक्यामध्ये ६०१ हेक्टर आणि तिवसा तालुक्यातील २१४६ हेक्टर वरील शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अकोला
वाशीम
यवतमाळ
बुलडाणा
अमरावती
५९.९
६७.५
५१.३
४४.४
६२.७
बातम्या आणखी आहेत...