आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाणीटंचाई’ची हुडहुडी, नवीन टाकीचे बांधकाम करण्यास विलंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘स्मार्टसिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराचा अविभाज्य घटक असलेल्या बडनेरामध्ये मात्र सध्या मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी झोपमोड करावी लागत असल्याने उन्हाळा कसा जाईल? या धास्तीने प्रत्येकाला ‘हुडहुडी’ भरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, सध्याची टंचाई, जुन्या वस्तीमध्ये नव्या टाकीच्या बांधकामासाठी होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बडनेरा शहरात मोठी लोकवस्ती असून, महापालिकेचा भाग आहे. असे असतानादेखील प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत असलेली तसेच तब्बल ४० वर्षे जुनी असलेल्या जुनी वस्ती येथील पाण्याची उंच टाकी पाडण्यात आली. शिकस्त झाली असल्याने पाण्याची टाकी पाडणे गरजेचे होते, मात्र तत्पूर्वी नवीन टाकीच्या बांधकामास कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावाखेरीज नवीन टाकी बांधकामाचे कोणतेही नियोजन नसताना पाण्याची टाकी पाडण्यात आल्याने येथील नागरिकांवर आता पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेली नगरोत्थान योजना बारगळल्याने बडनेरा जुनी वस्ती भागातील पाण्याच्या टाकीच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. जुनी वस्ती नवी वस्ती भागात विभागलेल्या बडनेरा शहराला सद्य:स्थितीत एकाच पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता दोन्ही भागासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी असणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कोणतेही नियोजन नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून महादेव खोरी, बडनेरा, गोपालनगर, सातुर्णा आदी

पाडण्यासाठी निधी, बांधण्यासाठी नाही
^मध्यरात्रीच्यापाणीपुरवठ्यामुळेजागरण करावे लागत आहे.शिवाय घरावरच्या टाकीमधून पाणी वाया जाते. माळीपुऱ्यातील नळाद्वारे नारूसदृश कृमीदेखील आला. टाकी पाडण्यासाठी निधी मिळतो, मात्र बांधकामासाठी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. दोन दिवस पाणीपुरवठा होत नसून, हे पाणी वीज प्रकल्पाला मिळण्याची शक्यता आहे. शिवाय लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संदीप इंगोले, प्रहारउपशहर प्रमुख.

तातडीने सुरू करावे टाकीचे बांधकाम
^कमीदाबामुळेजुनी वस्ती परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नवीन टाकी बांधकामासाठी आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला आहे. या टाकीचे बांधकाम करण्याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. प्रा. विजय नागपुरे, नगरसेवक.

अमृत योजनेला गती नाही
बडनेरायेथील पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव अमृत योजनेतून पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. पाणीपुरवठ्याची समस्या निकाली निघावी म्हणून मजीप्राकडून यापूर्वी नगरोत्थान योजनेतून शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात याबाबत चर्चा झाली होती.

नियोजन गरजेचे
जुनी वस्ती येथील २० लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधता यावी म्हणून मजीप्राकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने नजीकच्या काळात टाकीचे बांधकाम होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे नागरिकांनाच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल.
जुनी वस्ती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरातील जुनी टाकी पाडण्यात आलेली जागा.