आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत धार्मिकस्थळाची अवमानना, नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीतील फ्रेजरपुरा परिसरातील धार्मिकस्थळाजवळ एका व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याने संतप्त नागरिकांनी पाेलिस ठाण्यावर धडक देत संबंधित व्यक्तीच्या अटकेची मागणी केल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला हाेता.
पाेलिसांनी िदलेल्या माहितीनुसार, साेमवारी दुपारी परिसरात एका महिलेचा परिसरातील एका व्यक्तीचा वैयक्तिक कारणांवरून दुपारी किरकाेळ वाद झाला हाेता. यानंतर या व्यक्तीने परिसरातील धार्मिकस्थळासाेबत असभ्य वर्तन केल्याचा अाराेप संबंधित महिलेने केल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला हाेता. घटनेची माहिती हाेताच परिसरातील नागरिकांनी सायंकाळी उर्वरितपान. १२ फ्रेजरपुरापाेलिस ठाणे गाठत संबंधित व्यक्तीच्या अटकेची मागणी केली.

महिलेने या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पाेलिसात दाखल केली. संबंधित व्यक्तीने धार्मिकस्थळाजवळ जात असभ्य वर्तन केले, तसेच अापल्याला िशवीगाळ केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले अाहे. घटनेनंतर पाेलिसांनी संबंधित व्यक्तीविराेधात फ्रेजरपुरा पाेलिस ठाण्यात अश्लील िशवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, नागरिकांनी या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली अाहे.

गुन्हा दाखल केला
सदरप्रकरणीमहिलेची तक्रार प्राप्त होताच आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच ठाण्यामध्ये आलेल्या नागरिकांनी त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देवराज खंडेराव, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
संबंधित व्यक्तीला अटक करा
घटनेची माहिती प्राप्त हाेताच परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत पाेलिस ठाण्यावर धडक िदली. परिसरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करत पाेलिसांनी त्याला अटक करणे गरजेचे अाहे.
अरुण जयस्वाल, नगरसेवक
फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यावर धडकलेला जमाव.
बातम्या आणखी आहेत...