आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागामधील प्रकल्प अद्यापही तहानलेलेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विभागातील मोठे मध्यम प्रकल्प मागील वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात सरासरी निम्मेच भरले असून, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा या मोठ्या प्रकल्पात जेमतेम ६.३६ टक्केच जलसाठा झाला आहे. विभागातील पाचही जिल्ह्याच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये सर्वाधिक जलसाठा झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वात कमी १५ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे.
यावर्षी तुलनेने पाऊस कमी झाल्यामुळे याचा परिणाम विभागातील धरणाच्या जलसाठ्यावर झाला आहे. सर्वाधिक परिणाम अकोला िजल्ह्यातील धरणांवर झाला असून, अकोला
जिल्ह्यातील काटेपुर्णा या मोठ्या धरणात केवळ ६.३६ टक्के जलसाठा होऊ शकला. जिल्ह्यात असलेल्या निर्गुणा, मोर्णा उमा या मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १४.९५ टक्केच जलसाठा
झाला. मागील वर्षी जुलैच्या अखेरमध्ये या प्रकल्पांमधील जलसाठा २५.७८ टक्के होता. काटेपुर्णामध्ये यावेळी जलसाठ्याची २२.०६ टक्के नोंद करण्यात आली होती. विभागातील अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती इतर जिल्हयाच्या तुलनेत समाधानकारक आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पामध्ये ५३.९२ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी
याच महिन्याच्या अखेरीस धरणात ८८.१२ टक्के जलसाठा होता. शहानूर, चंद्रभागा, पुर्णा सपन या मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ५६.७७ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी हा साठा ७०.९८
एवढा होता. यवतमाळ िजल्ह्यातील पुस प्रकल्पात २१.८४, अरूणावती १२.१६ तर बेंबळा प्रकल्पात ४६.६८ टक्के जलसाठा झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण, सोनल एकबुर्जी या
मध्यम प्रकल्पांमध्ये २२.०९ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी हा साठा १५.५१ टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत वाशीम जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती यावर्षी समाधानकारक आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये २०.४९ टक्के साठा असून, मागील वर्षी हा साठा २७.६० टक्के होता. खरीपात नुकसान सहन केल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पीकांवर असतात. दरम्यान, धरणात मुबलक साठा निर्माण झाल्यास याचा परिणाम सिंचनावर होऊन रब्बी हंगामालाही मोठा झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मोठ्या प्रकल्‍पातील जलसाठा..