आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीने जिंकली अखेर 'स्मार्ट सिटी'ची खडतर स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बहुचर्चित 'स्मार्ट सिटी'च्या अडथळ्यांची शर्यत अमरावतीने अखेर जिंकली असून, महापािलकेत आनंदाला उधान आले आहे. राज्यातील २० महापािलका नगरपालिका अशा २३ शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात अमरावतीने पहिल्या सहांमध्ये बाजी मारली असून, आगामी पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांच्या विकासकामांवरही दावा ठोकला आहे.
'स्मार्ट सिटी'च्या निवडीसाठी केंद्र शासनाने एक उच्चाधिकार समिती (हाय पॉवर कमिटी) नेमली होती. शहरविकास मंत्रालयासह केंद्र सरकारचे चार सचिव आणि राज्य शासनाच्या विविध खात्यांच्या सचिवांसह राज्याचे मुख्य सचिव असे १३ ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी या समितीचे सदस्य होते. या समितीने गेल्या आठवड्यात मुंबईत सर्व स्पर्धकांशी चर्चा करुन त्यांचे सादरीकरण समजून घेतले. आयुक्त चंद्रकांत गुडेवार व्यक्तीश: या समितीसमोर उपस्थित होते. त्यांचे सादरीकरण आणि तयारी पाहून अधिकाऱ्यांनी यापूर्वीच होकारार्थी भाव दर्शवला होता. दरम्यान आजच्या घोषणेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
'स्मार्ट सिटी' साठी महाराष्ट्राला १० शहरांची निवड करावयाची होती. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून मुंबईत प्रेझेंटेशन सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते आटोपल्यामुळे उच्चाधिकार समितीने शुक्रवारी १० शहरांची नावे केंद्र सरकारकडे पाठवली आहेत. यामध्ये अमरावतीसह विदर्भातील पहिल्या क्रमांकाचे मुख्य शहर नागपूर, नवी मुंबई, पुणे-पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, मुंबई, सोलापूर, कल्याण डोंबिवली औरंगाबादचा समावेश आहे.
आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांची एंट्री झाल्यानंतर एप्रिलपासून या कामाला अधिक गती मिळाली. दरम्यानच्या काळात स्वत: आयुक्त महापौर चरणजीतकौर नंदा यांनी दिल्ली येथील कार्यशाळेला हजेरी लावली. त्यानंतर खऱ्या अर्थाने 'स्मार्ट सिटी'च्यादृष्टीने प्रवास सुरू झाला.'स्मार्ट सिटी' स्पर्धेत भाग घेण्याचा संकल्प सोडल्यानंतर मनपाला ११ पानांचा मुद्देनिहाय प्रस्ताव तयार करावा लागला होता. त्यानुसार निरनिराळ्या कराच्या रुपाने मनपाने यावर्षी २४५ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला असून, भविष्यात ३६३ कोटींच्या अतिरिक्त उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे.
सारे मिळून कामाला लागू
स्पर्धा जिंकल्याचा मनस्वी आनंद झाला. काही दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीला आज आकार मिळाला आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रम केले त्या सर्वांचे अभिनंदन करते.तसेच पुढील कामांसाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन करते. चरणजीतकौरनंदा, महापौर, अमरावती.
आता माघार नाही
आजची घडामोड ही अपेक्षितच होती. शासनाच्या अटीनुसार मनपाला दरवर्षी ५० कोटी रुपये खर्च करावयाचे आहे. तसा ठराव याआधीच झाला अाहे. त्यामुळे आता माघार नाही. सर्वांच्या सहकार्याने निश्चितच हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाईल. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, महापािलका, अमरावती.

या अधिकाऱ्यांनी घेतली मेहनत : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दिमतीला करमूल्य निर्धारण अधिकारी महेश देशमुख सिस्टीम मॅनेजर सचिन पोपटकरही मुंबईला गेले होते. देशमुखांचे मुंबई जाणे विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त असले तरी स्मार्ट सिटीच्या सादरीकरणात पोपटकर यांची मदत झाल्याचे आयुक्त सांगतात. दरम्यान स्थानिक पातळीवर प्रारंभिक इनपुट गोळा करण्यासाठी उपायुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर कन्सलटंट देशमुख यांनी बरीच मेहनत घेतली आहे.
काय असेल 'स्मार्ट सिटी'मध्ये ? : स्मार्टिसटीच्या प्रस्तावामध्ये स्वच्छ भारत िमशन अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयांची बांधणी, नागरिकांच्या तक्रारींची ऑनलाईन सोडवणूक, डीजीटल पद्धतीच्या मासिक पत्रिकेचे प्रकाशन, सेवा देण्यास विलंब झाल्यास स्वत:वर दंड लावून घेण्याची हमी, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अदायगी, मुबलक पाणी,करवसुलीत प्रथम, चांगले रस्ते आदी मुद्द्यांचा समावेश आहे.