आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांसाठी मदत, निवृत्तिवेतनाची ग्वाही, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनाचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तुटपुंजेवेतन आणि मानधनावर वर्षानुवर्षे माध्यमांमध्ये काम करणाऱ्या श्रमिक पत्रकारांना घरांसाठी मदत आणि निवृत्तिवेतन देण्याची ग्वाही देत शासन त्यासाठी एका योजनेची आखणी करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे राजापेठच्या मनपा संकुलात उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार आनंदराव अडसूळ होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या माध्यम समूहांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनाही फारशी रक्कम मिळत नाही. त्यामुळे सामाजिक सुरक्षा म्हणून त्यांना निवृत्तिवेतन देण्याबाबत शासन विचार करत आहे. विधिज्ञ या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर याबाबतची योजना आकाराला आणली जाईल. पत्रकारांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. प्रसंगी त्यांना वाईट प्रसंगांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन िवचार करीत असून, एक ठोस कायदा तयार केला जावा, असे प्रयत्न सुरू आहेत. श्रमिक पत्रकार भवनाचे स्वरूप पाहून आनंदित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला दहा लाख रुपये मदतीची घोषणा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अडसूळ यांनीही तेवढ्याच रकमेची मदत घोषित करून त्यातून एखादा लोकोपयोगी उपक्रम सुरू करावा, अशी सूचना केली. या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचेही भाषण झाले. पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. श्रमिक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष यदू जोशी या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष शिवराय कुळकर्णी यांनी केले.

ज्येष्ठपत्रकारांचा सत्कार : अगदीआटोपशीर अशा कार्यक्रमात श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी ‘दर्पण’कार प्रदीप देशपांडे, नानक आहुजा, शशिकांत ओहळे, सुरेश शुक्ल, मनोहर परिमल, जितूभाई दोशी, कुमार बोबडे, देवदत्त कुळकर्णी, अनिल जाधव यांच्यासह इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट उत्तमरीत्या पूर्ण करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुधीर कपाटे आणि नंदकिशोर काकडे यांचा सत्कारही केला.

समाजातनकारात्मकता निर्माण होणार नाही, याचा प्रयत्न माध्यमांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आशा ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते म्हणून यासाठी माध्यमांचा वाटा मोलाचा आहे. सकारात्मकता आणून आशा निर्माण करण्याचे काम माध्यमांनी केले नाही, तर समाजाची मोठी हानी होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. १९) केले.
वालकट कम्पाउंड येथे प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या नवीन पत्रकार भवनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य होते. प्रमुख पाहुणे पालकमंत्री प्रवीण पोटे होते. फडणवीस म्हणाले की, शासन समाजातील नकारात्मक बाबींवर बोट ठेवण्याची जबाबदारी जसे माध्यमे पार पाडतात त्याच ताकदीने समाजात हास्य फुलण्याचेही उत्तम कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून होऊ शकते. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली की, त्याच्या बातम्या होतात. परंतु, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये काय सुरू आहे, हे कधीच पुढे येत नाही. ज्या अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे त्या अडचणी जगासमोर आणण्याचे काम माध्यमांनी करावे जेणेकरून या आत्महत्या टळतील. प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी, तर आभार क्लबचे सचिव त्रिदीप वानखडे यांनी मानले.

राज्याला पावसाची गरज
राज्यातसध्या पावसाअभावी भीषण अवस्था निर्माण झाली आहे. राज्यात सध्या सर्वाधिक गरज ही फक्त पावसाची आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पाऊस आल्यामुळे अत्यानंद झाला. परंतु, राज्यात पावसाची अवकृपा झाल्यास भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली.

प्रभाकररावांच्या‘कॅबिनेट’चे वास्तव : विदर्भाचेभले होईल, या आशेने येथील माणूस आतापर्यंत मुंबईकडे आशेने पाहत होता. विदर्भात पाणी, जमीन आहे पण उद्योग नाही. विमानतळ नाही. पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन येथे उद्योग उभे राहिल्यास येथील माणसाला रोजगार मिळेल. परंतु, या गोष्टी आणण्यासाठी कॅबिनेट दर्जाचा मंत्री या भागातील असणे आवश्यक आहे. राज्यमंत्र्यांचे पद हे केवळ उद्घाटन भूमिपूजनापुरतेच असल्याचे बोचरे वास्तव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी मांडले. यावर फडणवीस यांनी मिश्कीलपणे डोळे मिचकावून एकप्रकारे विभागावर झालेला अन्याय मान्य केला असल्याची चर्चा सभामंडपात सुरू होती. यावर फडणवीस यांनी आता अमरावती विभागाचे दिवस सुरू झाल्याचे सांगून विकासाची हमी देत वैद्य यांना आश्वस्त केले.

मेळघाटछायाचित्र प्रदर्शनासाठी जहांगीर आर्ट गॅलरीत हवी जागा : मेळघाटातीलछायाचित्र प्रदर्शित करता यावे, म्हणून मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

‘हवामान तज्ज्ञ’ जिल्हाधिकारी : मुख्यमंत्रीफडणवीस शहरात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा केली. यावर गित्ते यांनी सध्याची स्थिती पावसासाठी कशी अनुकूल आहे, हे तांत्रिकदृष्ट्या फडणवीस यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी आल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गित्ते यांचा अंदाज हवामान विभागापेक्षा खरा ठरल्याचे फडणवीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले. त्यामुळे भविष्यात हवामानखात्याने गित्ते यांना पळवून नेऊ नये म्हणजे झाले, असेही ते म्हणाले.

पत्रकारांचा सत्कार
जिल्ह्यातमागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उल्हास मराठे, नवीनचंद्र शाह, मो. अशरफ हाफीज हबीब उर्फ अशरफभाई, रोहितप्रसाद तिवारी, चेतन पसारी, गिरीधर देशमुख या पत्रकारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

पालकमंत्रीपोटे यांचाही सत्कार
प्रेसक्लबला जागा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री पोटे यांचाही क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. १५ लाख रुपये खर्च करून पंधराशे चौरस फूट जागेवर क्लबची इमारत बांधण्यात येणार आहे

शिवाजी संस्थेची मुद्रा पोहोचली सीएमपर्यंत
वदर्भातीलनामवंत शैक्षणिक संस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने अमृत महोत्सवी विर्षानिमित्त ‘मुद्रा महाराष्ट्राची’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. राज्यभरातील कसलेल्या लेखकांचे विचार त्यातून प्रतिबिंबित झाले आहे. या ग्रंथाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांना या वेळी भेट म्हणून देण्यात आल्या.


वालकट कम्पाउंड येथे प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या नवीन पत्रकार भवनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...