आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amry Man Give Financial Help To Suicide Farmer Family

सीमेवरचा ‘जवान’ धावला ‘किसान’च्या मदतीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता, परंतु सध्या दुष्काळामुळे देशाला पोसणारा किसान अडचणीत आला आहे. दुष्काळामुळे हाच बळीराजा आपली जीवनयात्रा संपवायला निघालेला आहे. अशीच हृदयाला चटका लावणारी घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावात नुकतीच घडली. गावातील शेतकरी नारायण मल्लीकार्जुनआप्पा पंछिरे यांनी अवघ्या तारुण्यात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने पंछिरे कुटुंबाची काय अवस्था या विचाराने समाजाचं आपणही काहीतरी देणं लागतं या भावनेने सीमेवर लढणारा एक जवान या कुटुंबाच्या मदतीला धावून आला आहे. इंडियन एयर फोर्समधून सेवानिवृत्त झालेले नंदकुमार चौधरी असे या जवानाचे नाव आहे. नंदकुमार चौधरी यांनी पंछिरे कुटुंबाला अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांना पाठबळ दिले. अमरावती शहरातील व्हीएमव्ही रोडवरील उदय कॉलनी येथे ते राहतात.

दरम्यान, दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या कास्तकारांना नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन स्थापन करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे आले आहेत.. परंतु, नंदकुमार चौधरी यांनी त्यांच्या पत्नी पद्मश्री स्वत:च्या प्रेरणेतून पंछिरे कुटुंबाला मदत केली आहे. चौधरी हे इंडियन एयर फोर्समधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती हा व्यवसाय सुरू केला. स्वत: शेतकरी असल्याने त्यांना बळीराजाची एकंदरीत परिस्थितीची माहिती होती. चौधरी यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असून, कास्तकाराला मदत ही सक्षम माणसाची जबाबदारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मदतीतून इतरांना प्रेरणा मिळेल. मॉर्निंग वॉक ग्रुप अरुण भेटाळू या मित्रांनी पाठबळ दिल्यानेच या कुटुंबापर्यंत पोहोचू शकलो, असे चौधरी यांनी सांगितले.

इतरांना प्रेरणा मिळेल
या मदतीमुळे इतरांना प्रेरणा मिळावी, हाच मुख्य उद्देश आहे. कास्तकारांचे मनोबल उंचावण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासन आपले काम करतच आहे. पण, सक्षम नागरिकांनी आपली जबाबदारी आेळखून समाजाला काहीतरी देणं लागतं यासाठी धडपड करायला हवी. वैयक्तिक समस्या या आयुष्यभरच असतात, पण त्यातूनही इतरांना प्रेरणा मिळेल, असे काम केले तर ते या समस्याही सहज सुटतात.'' नंदकुमारचौधरी, सेवानिवृत्त इंडियन एयर फोर्स.

१९ ऑगस्टला केली आत्महत्या : नांदगावखंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी येथील ऐन सणासुदीच्या दिवसात नारायण यांनी अर्धा लीटर विष प्राशन केले. जगण्याची इच्छाच नसल्यामुळे यातूनही आपण वाचायला नको म्हणून त्यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, चौधरी यांनी आपले मित्र भेटाळू यांच्यासोबत मंगळवारी पंछिरे यांच्या घरी जाऊन त्यांना अकरा हजार रुपयांची मदत केली.