आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगावात सशस्त्र दरोडा, व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेरट्यांनी घरातील महिलेचे केस बंद दारामध्ये अडकवून महिलेला मारहाण केली दारात गुंतलेले महिलाचे केस - Divya Marathi
चाेरट्यांनी घरातील महिलेचे केस बंद दारामध्ये अडकवून महिलेला मारहाण केली दारात गुंतलेले महिलाचे केस
अमरावती- एकाव्यापाऱ्याच्या घरात घुसून दरोडेखोरांनी धारदार शस्त्र लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला चढवून ५० हजारांची रोकड लंपास केली. हा थरार बुधवारी (दि. ८) पहाटे वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेले व्यापारी दीपक किसन लढ्ढा (४८ ) यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
दीपक लढ्ढा यांचा हार्डवेअरचा व्यवसाय असून, गोकूलढुसा, महेश काॅलनी परिसरातच त्यांचे दुकान घर आहे. बुधवारी पहाटे वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात पाच बुरखाधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. या वेळी घरात दीपक लढ्ढा त्यांची एक मैत्रीण होती. दरोडेखोरांनी लढ्ढा यांच्या मैत्रिणीला मारहाण केली तसेच लढ्ढांनाही मारले. घरात ऐवज कुठे आहे, अशी विचारणा दरोडेखोरांनी केली. दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा लढ्ढा यांनी प्रयत्न केला. त्या वेळी दरोडेखोरांनी लोखंडी सळीने त्यांच्या डोक्यावर पायावर हल्ला चढवला तसेच पोटावर चाकू मारले.
या हल्ल्यात लढ्ढा गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. दरम्यान, दरोडेखोरांनी लढ्ढा यांच्या घरातील कपाट तोडून कपाटातील ५० हजारांची रोख लांबवली. या वेळी लढ्ढा यांच्या मैत्रिणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिच्याही हातावर दरोडेखोरांनी चाकू मारला. यामध्ये तिच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली आहे. हे दरोडेखोर हिंदीत बाेलत होते. त्यांनी जवळपास २० मिनिटे घरात थैमान घातले. त्यानंतर रक्कम घेऊन पाचही दरोडेखोर पसार झाले.

दरोडेखोरांचा शोध सुरू
व्यावसायिकलढ्ढा यांच्या घरी बुधवारी पहाटे वाजताच्या सुमारास पाच बुरखाधारींनी दरोडा टाकला. यामध्ये लढ्ढा यांना गंभीर मारहाण झाली तसेच रोखही लंपास केली आहे. तसेच त्यांच्या मैत्रिणीलाही जखमी केले. आम्ही गुन्हा दाखल केला असून, दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. गजाननपडघन, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी.

चाेरट्यांनी घरातील महिलेचे केस बंद दारामध्ये अडकवून महिलेला मारहाण केली.