आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिधावस्तू ,केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती जिल्ह्यातीलपुरवठा विभागाच्या सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांचे सप्टेंेबर, २०१५ च्या वितरणाकरिता रास्तभाव दुकानदारांना २१ ऑगस्टपासून धान्याचा पुरवठा सुरु झाला असून रास्तभाव दुकानदारांनी जिल्ह्यातील कार्यरत शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अंत्योदय कार्ड संख्येनुसार धारकांसाठी प्रति शिधापत्रिका २० किलो गहू, १५ किलो तांदूळ वितरित करण्यात येतील. गव्हाचा प्रतिकिलो दर रुपये असून तांदूळ प्रतिकिलो रु. या दराने वितरित करण्यात येईल. प्राधान्य गटातील लोकसंख्येनुसार धारकांसाठी रु. प्रति किलो या दराने प्रति व्यक्ती किलो गहू वितरित करण्यात येणार असुन रु. प्रति किलो या दराने प्रति शिधापत्रिका किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. तर साखरेचा दर प्रति ५०० १५० ग्रॅम १३.५० रु. आहे. एपीएल (केशरी) शेतकरी कुटुंबांसाठी प्रति व्यक्ती किलो गहु रु. दराने तर प्रति व्यक्ती किलो तांदुळ रु. या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

अंत्योदय योजनेकरिता प्रतिकार्ड २० किलो गहू प्रतिकार्ड १५ किलो तांदूळ तसेच प्राधान्य गटाकरीता प्रतिव्यक्ती किलो गहु किलो तांदुळ मंजूर केला आहे. तसेच एपीएल केशरी शेतकरी कुटुंबांसाठी गहु प्रति व्यक्ती किलो तांदुळ किलो अन्नधान्य मंजुर केलेे आहे. सप्टेंबरकरीता कार्डधारकांना साखरेचे वाटप सुरु आहे. केरोसीन वितरण बिगर गॅस शिधापत्रिकांसाठी- मनपा क्षेत्रात प्रतिमाह प्रतिकार्ड प्रतिव्यक्ती लिटर जास्तीत जास्त २४ लीटर, नगरपालिका क्षेत्रात प्रतिकार्ड प्रतिव्यक्ती लिटर जास्तीत जास्त २० लिटर तर ग्रामीण भागात प्रतिमाह प्रतिकार्ड प्रतिव्यक्ती लिटर जास्तीत जास्त १५ लीटर केरोसीन उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.