आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कल, तलाठ्यासह तिघे अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - शेतीचे आपसी वाटणीपत्र करण्यासाठी लाच मागणारे तिवसा तहसीलचे मंडळ अधिकारी, तलाठी एका मध्यस्थी करणाऱ्या इसमास सोमवार, १० ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्याची घटना घडली. ही कारवाई येथील तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.

सविस्तर वृत्तानुसार, कुऱ्हा बीट परिसरातील बंगरे नामक शेतकऱ्याला भावंडांच्या नावे शेताची आपसी वाटणीपत्र करावयाचे होते. यासाठी विनोद रणजितसिंह बंगरे (३२) रा. कुऱ्हा यांनी येथील महसूलचे मंडळ अधिकारी सुभाष पुंडलिक खाकसे (५४), तलाठी संजय ओंकारराव सांगळूदकर (५०) दोघेही रा. तिवसा कुऱ्हा येथील मध्यस्थ रमेश रघुनाथ भक्ते (५३) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यासाठी उपराेक्त तिघांनीही बंगरे यांच्याकडे १८ हजार रुपयांची लाच मागितली. बंगरे यांनी याबाबत अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मात्र, खाकसे, सांगळूदकर भक्ते यांनी पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, बंगरे यांच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंडल अधिकारी, तलाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीस अटक केली. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक उराळे, कैलास सानप, एस. सी. बारट, पी. सी. धाबोरकर, विनोद दाभणे, श्रीकृष्ण तालव यांनी केली.