आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Faked, Purandare Is Incomplete Historian Vijay Deshmukh

आसाराम ढोंगी, पुरंदरे अपूर्ण इतिहासकार - ‘शककर्ते शिवराय’कार विजयराव देशमुख यांचे रोखठोक मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सध्या तुरुंगात असलेले आसारामबापू हे ढोंगीपुरुष असून, महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त बाबासाहेब पुरंदरे हे परिपूर्ण इतिहासकार नसल्याचे स्पष्ट मत ‘शककर्ते शिवराय’कार विजयराव देशमुख यांनी नोंदवले आहे.अंबापेठ स्थित गोपाळकृष्ण मंदिराच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त शनिवारी त्याठिकाणी संत पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आलेल्या देशमुख यांनी दुपारी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपली रोखठोक निरीक्षणे नोंदवली.

ते म्हणाले की, संत लालसारहित कर्म करतात. त्यांनी आपली ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये अंतर्मुख केलेली असतात. त्यामुळेच त्यांच्या हातून र्इश्वरी कार्य घडते. ते अंधश्रद्धेला कुठलाही पाठिंबा देत नाहीत किंवा संमोहन शास्त्राचाही वापर करीत नाहीत. आसारामबापू या व्याख्येत कुठेही बसत नाहीत. त्यामुळे त्यांना संत कसे म्हणायचे ? हा देशमुख यांचा प्रश्न आहे. या शृंखलेत त्यांनी इतर ढोंगी संतांचाही समाचार घेतला. त्यांच्यामते लालसा पुढे ठेवून कामे करणारे कधीही संत होऊ शकत नाहीत. ते तद्दन ढोंगीपुरुषच असतात. बाबासाहेब पुरंदरे यांचा आदरपूर्ण उल्लेख करीत देशमुख म्हणाले की, ते उत्कृष्ट शिवचरित्रकार आहेत. मी स्वत:ही त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी परिपूर्ण अभ्यास केल्याचे जाणवत नाही. तसे असते तर मिर्झा राजे रामसिंग आणि जयसिंग यांचे वकील बिमलदास परकलदास यांनी डिंगल लिपीत लिहून ठेवलेल्या घटनांचा त्यांची व्याख्याने किंवा ‘जाणता राजा’ मधून उल्लेख दिसून आला असता. या दोन्ही वकिलांनी त्यांच्या रोजनिशीत राजांच्या करारीपणाबद्दल बरेच काही लिहून ठेवले आहे. आग्रा येथील कैदेत असताना औरंगजेबांनी त्यांचा केलेला उपमर्द आणि तो सहन झाल्यामुळे शिवरायांनी केलेली कृती याचाही स्पष्ट लेखा-जोखा त्यामध्ये आहे. मात्र, तेही पुरंदरेंच्या तोंडून ऐकायला मि‌ळाले नाही. माझ्या ‘शककर्ते शिवराय’मध्ये ते पहिल्यांदा उमटले. चर्चेच्या वेळी प्रा. मोहन काटे, सोपान गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

इतिहासाची समीक्षा आवश्यकच : विजयरावदेशमुख यांच्या मते इतिहासाची समीक्षा आवश्यकच आहे. ती दर दहा वर्षांनी झाली पाहिजे. साहित्य कोणतेही असो त्याला ज्या काळात लेखन झाले त्या काळाच्या मर्यादा असतात. त्यामुळे काळानुरूप बदललेल्या परिदृश्यात ते बघणे अधिक उत्तम असते.

मानवांचे योग्य, सनातनचे चुकते
अंधश्रद्धेला कुठलेही संत पाठिंबा देत नाहीत, याचा पुनरुच्चार करीत देशमुख यांनी प्रा.श्याम मानव करीत असलेले कार्य योग्य असल्याचे सांगितले. त्याच वेळी सनातनचे प्रमुख जर संमोहन शास्त्राचा वापर करून त्यांचे कार्य सिद्धीस नेत असतील, तर ते गैर असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.