आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बसते चिमण्यांची पंगत; श्वानही घेतात भोजनाचा आस्वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - आधुनिक क्रांतीच्या जगात माणूस माणसापासून दुरावत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. एकेकाळी पक्षांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात व्हायची. मात्र आज ते चित्र कुठेही पहायला मिळत नाही. आधुनिक मानवी वस्त्यांमुळे पक्ष्यांनी मानवी वस्त्यांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. परंतु एका प्राणी, पक्षीवेड्या वल्लीमुळे चिमण्यांची पंगत; पक्ष्यांबरोबर मांजर, कुत्रीही भोजनाचा आस्वाद घेत असल्याचे आनंददायी चित्र येथील नागरिकांना पहावयास मिळत आहे.पक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे अशाेक जाधव. जाधव यांचे पक्षीप्रेम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
परतवाडा मार्गावर गावापासून अवघ्या तीन किमी. अंतरावर पेट्रोल पंपाजवळ अशोक जाधव यांचे चहाचे छोटेसे दुकान आहे. कधीमधी कुण्या वाटसरूने येथे चहासोबतच काही नाश्ता केला, तर पडलेले दाणे टिपण्यासाठी चार -दोन चिमण्या येत असत. या चिमण्यांनी जाधव यांना जणू लळाच लावला. मानवी वस्तीपासून दूर गेलेल्या या चिमकल्या जीवांना जवळ करण्याची तगमग त्यांना असह्य करून गेली. त्यासाठी काही तरी करावे, हा विचार त्यांच्या मनात होता, त्यांनी पक्ष्यांची पंगत बसवण्याचा निर्धार केला. सुरुवातीला या निर्धाराला पक्ष्यांनी दाद दिली नाही, परंतु जीवाला कोणताही धोका नाही, हे लक्षात येताच चिमण्यांसह इतर पक्ष्यांनीही या पंगतीला बसणे पसंत केले. आजच्या घडीला जाधव यांच्या घरासमोर दैनंदिन पक्ष्यांची पंगत बसते. या पक्ष्यांना नको आहेत पंचपक्वान्न हवे आहेत केवळ आपुलकीचे आणि सहवासाचे चार प्रेमाचे दाणे. जाधव त्यांना हेच देतात. म्हणून त्यांच्याप्रती या पक्ष्यांमध्येही लळा निर्माण झाला आहे. त्यांच्या टपरीवजा चहाच्या दुकानासमोर नित्यनियमाने सकाळी साडेसातच्या सुमारास दीडशे ते दाेनशेच्या संख्येने चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. पंगतीची वेळ झाली, हे जणू त्यांच्या चिवचिवाटातून जाधव यांच्या लक्षात आणून देतात. सकाळी दुकानाची साफसफाई केली की जाधव सोबत आणलेले खाद्य चिमण्यांसाठी ठेवतात. साेबत पाण्याचे भांडेही ठेवतात. ही पंगत एक दोन दिवसांपासूनची नव्हे, तर कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. पक्ष्यांना दाणा-पाणी घालण्याचा नित्यनियम कधीही चुकलेला नाही. त्यांच्या कुटुंबियांचेदेखील या कामी सहकार्य लाभते. चहा घेण्यासाठी त्यांच्या टपरीवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हा उपक्रम प्रेरणा देऊन जातो. दाणा-पाणी देण्यासाठी थोडा जरी वेळ झाला, की चिमण्या लगेच दुकानासमोरील मोकळ्या जागेत जमा होतात आणि मिळेल त्या वस्तूवर चोच मारून पंगतीची वेळ झाल्याचे सांगतात. चिमण्यांसाेबतच कावळा, भोरी इतरही पक्षी येथे पंगतीसाठी येत असतात.

एखादा दिवस जरी जाधव किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चिमण्या इतर पक्ष्यांना दाणा-पाणी करण्यास वेळ झाला, तर त्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत जमा होतात आणि मिळेल त्या वस्तूवर चोच मारून पंगतीची वेळ झाल्याचा जणू इशारा करतात. जाधव यांच्या सोबतीला दिवसभर एक मांजर कुत्राही असतो. घरून आणलेला डबा जाधव आधी त्यांना भरवतात. कुत्रा आणि मांजरीचे वैर सर्वश्रृत आहे, परंतु जाधव यांच्या सहवासात त्यांच्या सोबतीला असलेला कुत्रा मांजर आपले आपसातील वैर विसरून गुण्यागोविंदाने राहतात.
चिमण्यांसह कावळेही पंगतीला हजेरी लावतात.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पशुपक्षांचे फोटो व जाधव यांचा संदेश..