आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषितज्ज्ञावर चाकूने पं. स. मध्येच हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- देयकेकाढल्याचा राग डोक्यात ठेवून एका कंत्राटदाराने चक्क पंचायत समितीच्या कार्यालयात शिरून कृषी तज्ज्ञावर चाकूने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली.

शशिकांत मुंगळे हे दुपारी नेहमीप्रमाणे काम करीत कार्यालयात बसलेले होते. याचदरम्यान विशाल नामक कंत्राटदार त्या ठिकाणी आला. त्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या वृक्ष लागवडीच्या कामाचे देयक मागितले. या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात विशालने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मुंगळे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. मुंगळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आजपासून कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
पंचायतसमितीत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा विरोध म्हणून शनिवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यासोबतच दोषीवर कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.