आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या यात्रेत चुलीवर मडक्‍यात शिजते मटण, घुंगराच्‍या नादात बेभान होऊन थिरकतात अबालवृद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विविध लोककलांच्‍या रंगांची मुक्‍तपणे उधळण करणारी चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम बाबा यात्रा. कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दीड महिना ही यात्रा भरते. मातीच्‍या मडक्‍यात शिजवलेले मटण आणि चुलीवरची भाकरी या यात्रेचे खास आकर्षण. मटणाची  चव चाखण्‍यासाठी हजारो खवय्ये यात्रेत सहभागी होतात.

आज आम्ही खास आपल्यासाठी बहिरम बाबाच्या यात्रेची माहिती घेऊन आलो आहे.

चला तर मग, बहिरम बाबाच्‍या यात्रेतील खास बाबींवर टाकू या एक नजर....
- दरवर्षी डिसेंबर महिन्‍याच्‍या दुसर्‍या आठवड्यात यात्रेला सुरूवात होते. 
- विदर्भातील दीड महिना चालणारी यात्रा म्हणून 'बहिरम बाबाच्या नावाने राज्यात प्रसिद्ध आहे.
- महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
- पूर्वी लोककलांच्‍या नावाखाली काही अवैध प्रकार येथे होत असत.

बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्‍पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून डोंगराळ भागात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्‍ये एकमेकांना मेजवाण्या चालतात. येथील देवालाही पूर्वी बकर्‍याचा नैवद्य दिला जात असल्याचे भाविक सांगतात. दोन्‍ही वेळी मटणाची पंगत असल्‍याने कोणीही कोणाच्‍या पंगतीत जात असे. ब्रिटिशांनीही या यात्रेची दखल घेतली होती. तत्कालीन तहसीलदार यात्रेत मुक्‍कामी थांबत विशेष म्हणजे यात्रेतून सर्व कार्यवाही केली जात होती.

पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून पाहा, बहिरम बाबाच्‍या यात्रेतील खास फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)