आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागात बाप्पा गणेशाला दिला भाविकांनी निरोप, तगडा पोलिस बंदोबस्त होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; विद्येची देवता गणपती बाप्पांची १७ सप्टेंबरला स्थापना झाली. अतिशय आनंदाने व धार्मिक वातावरणात सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतो. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत पाहिले असता पहिल्या दिवसापासून गणपती विसर्जनाला सुरुवात होते, तर १३ व्या दिवसांपर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये १० व्या दिवशी सर्वाधिक मूर्तींचे विसर्जन होते.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये यंदा ५ हजार ९४७ सार्वजनिक गणेशमंडळांनी मूर्तींची स्थापना केली होती. यापैकी अमरावती जिल्ह्यात १ हजार १५१, अकोला जिल्ह्यात १ हजार ७७१, यवतमाळ १ हजार ५३०, बुलडाणा ८७४ आणि वाशीम ६२१ सार्वजनिक मंडळांनी एकूण ५ हजार ९४७ मूर्तींची स्थापना केली होती.

गुरुवारी १७ सप्टेंबरला गणेशाची स्थापना झाल्यानंतर अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवसापासून गणेश विसर्जनाला दीड दिवसाच्या गणेश स्थापनेनंतर सुरुवात झाली होती. याचवेळी अमरावती ग्रामिण, बुलडाणा व वाशीम या जिल्ह्यांमध्ये सहाव्या दिवसांपासून विसर्जनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या पाच दिवसांत गणेश विसर्जनाची संख्या अत्यंत कमी होती. मात्र नवव्या दिवसांपासून विसर्जनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विभागातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

गणेश विसर्जनादरम्यान सर्वत्र शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांनी प्रत्येक गावात बंदोबस्त तैनात केला आहे. यातही रविवारी २७ व सोमवारी २८ सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत या दोन दिवसांमध्ये तगडा पोलिस बदोबस्त विभागात तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान अमरावतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी यावर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. त्यासाठी सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मिळून ‘जिल्हाधिकारी निवास गणेशोत्सव मंडळ’ स्थापन केले आहे. या उत्सवामुळे एरवी रुक्ष वातावरण राहणाऱ्या या बंगल्याच्या परिसरात गणेशोत्सवाच्या दहा दिवस चांगलीच वर्दळ होती. ती आज, रविवारी २७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर
संपुष्टात आली.