आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप बमसंचा विधान भवनावर गुरुवारी महामोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संविधान आणि आरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गुरुवारी (दि. १५) नागपूर विधानभवनावर भारिप बहुजन महासंघाचा महामोर्चा निघणार असून या मोर्चात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल बरडे यांनी केले आहे. नागपूर येथील पटवर्धन मैदान, यशवंत स्टेडियम येथून मोर्चाला प्रारंभ होईल. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करतील. या वेळी संविधान, आरक्षणासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे कळवण्यात आले आहे. दरम्यान, या आठवड्यात आणखी मोर्चे अधिवेशनावर धडकणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...