आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध दाम्पत्यच बनले २० अंध मुलींच्या जगण्याचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दोन्ही डोळ्यांची दृष्टी नाही. मात्र, त्यांच्या मनाच्या मोठेपणाची व्याप्ती अफाट आहे. अंधांना शिक्षणासाठी किती हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, ही बाब त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कळली. म्हणूनच त्या दाम्पत्याने स्वत:च्या वेतनातून तब्बल २० मुलींच्या शिक्षणासह स्वत:च्या घरीच निवास भोजनाची व्यवस्था केली आहे. मागील नऊ वर्षांपासून त्यांची ही सेवा सुरू आहे.
पंजाब राघोराव पाटील आणि मंदा पंजाबराव पाटील, असे या दाम्पत्याचे नाव आहे. पंजाबराव मंदाताई हेसुद्धा दृष्टिहीन आहेत. मात्र, या अपंगत्वावर मात करून दोघांनीही आपले शिक्षण पूर्ण केले. २००० मध्ये त्यांनी नोकरीसाठी नांदेड गाठले. त्या ठिकाणी एका शाळेवर दोघेही नोकरी करत होते. त्यांना महिन्याकाठी हजार रुपये मानधन मिळायचे. दोन वर्षे काम केल्यानंतरही त्या शाळेला अनुदान आल्यामुळे शाळा बंद पडली. आता जगायचे कसे? असा यक्षप्रश्न पाटील दाम्पत्यापुढे उभा ठाकला. मात्र, ते डगमगले नाहीत, पंजाबरावांनी अमरावती गाठले एमए बीएड पूर्ण केलेल्या तरुणाने परिस्थितीमुळे रेल्वेमधून खेळणी विकण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे त्यांनी याच मार्गातून उदरनिर्वाह चालवला होता. दरम्यान, शहरातील महिंद्र विद्यालयात त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली. जगण्याचा प्रबळ आधार मिळाल्यामुळे ज्या अंध मुलींची शासकीय वसतिगृहात निवासाची व्यवस्था नाही, मात्र त्यांना शिकायचे तर आहे, अशा मुलींना घरीच आधार देण्याचा निर्णय घेतला. २००६ पासून त्यांनी अंध मुलींना आधार देण्यासाठी सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्यांच्याकडे मुली होत्या. दरम्यान, २००९ मध्ये मंदाताईंनासुद्धा सर्व शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी स्वरुपात नोकरी लागली. भाड्याच्या घरात राहणाऱ्या या दाम्पत्याने वडाळी परिसरातील देवीनगरमध्ये घर घेतले. त्या ठिकाणी तीन खोल्यांचे घर बांधले. त्यापैकी एक खोली मुलींसाठी दिली. सध्या पाटील यांच्या घरी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या २० मुली आहेत. या मुलींच्या शिक्षणासह त्यांना शाळेत पोहोचवणे, भोजनाची व्यवस्था आदी सर्व भार पाटील दाम्पत्यानी उचलला आहे. पंजाब पाटील यांनी अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे, मात्र शासनाकडून अद्याप मदत झाली नसल्याचे पाटील दाम्पत्यांनी सांगितले.

अंध मुली मुलांना शासकीय निवासी शाळेत आठवीपर्यंत राहण्याची सोय आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी कोठे राहायचे, हा प्रश्न आहे. शासनाने समाजकल्याणच्या वसतिगृहात अपंगांसाठी टक्के आरक्षण ठेवले आहे. या टक्के अपंंगांमध्ये अंधांसह इतर अपंगांचाही समावेश होतो. त्यामुळे अतिशय कमी मुलींना वसतिगृहात संधी मिळते. अशा वेळी त्यांच्या शिक्षणात कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, हा उद्देश पुढे ठेवून पाटील दाम्पत्याने हा वसा घेतला आहे.

मुलींसाठी संगीत शिक्षकांची नेमणूक
पाटील यांच्याकडे राहणाऱ्या काही मुलींना संगीताची आवड आहे. त्यामुळे पाटील यांनी त्या मुलींना शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी संगीत शिक्षकांचीसुद्धा व्यवस्था केली. रोज सायंकाळी एक तास संगीत शिक्षक पाटील यांच्या घरी जाऊन मुलींना संगीताचे धडे देतात. पाटील यांच्याकडे मुंबई, पुणे, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, मध्य प्रदेश, अकोला या जिल्ह्यांतील मुली आहेत.

मुकेश दीक्षा यांची महत्त्वाची भूमिका
पाटील यांचा भाचा मुकेश भाचसून दीक्षा हे दोघे पाटील यांच्याकडेच राहतात. पाटील दाम्पत्याचा खरा आधार तेच आहेत. संस्थेेचे कामकाज, मंदा पाटील यांचे कार्यालयीन लिखापढीचे काम मुकेश हेच करतात, तर दीक्षा या घरातील संपूर्ण काम, मुलींसाठी स्वयंपाक करतात. त्यामुळे पाटील दाम्पत्याच्या या समाजसेवेमध्ये मुकेश दीक्षाची महत्त्वाची भूमिका आहे.

स्वतंत्र वसतिगृह असावे
अंध मुलींना आठवीपासून पुढे शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र वसतिगृह असावे, ते बांधण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुलींसाठी वसतिगृह झाल्यास त्यांच्या निवासाची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. कारण अंध मुलींना जगण्यासाठी काय धडपड करावी लागते, याचा अनुभव मी घेतला आहे.