आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच लाखांच्या लाचप्रकरणी एपीआयसह जमादाराला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती /मोर्शी - कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात आरोपी बनवण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या मोर्शी ठाण्यातील एपीआयसह जमादाराला सोमवार, १४ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. एपीआयसह जमादाराविरुद्ध मोर्शी पोलिस ठाण्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एपीआय आणि जमादाराने लाच मागितल्याची तक्रार जुलैत तक्रारदाराने एसीबीकडे दिली होती. मागील सहा महिन्यांपासून एसीबी या दोघांच्याही मागावर होती अखेर लाच मागितल्याची खात्री पटल्यावर सोमवार, १४ डिसेंबरला दोघांनाही पकडले आहे.

मोर्शी पोलिस ठाण्यात कार्यरत एपीआय संदेश सुरेश पालांडे वय ३४ (रा. विदर्भ कॉलनी, मोर्शी) आणि जमादार शामसिंग नारायणसिंग चुंगडा (वय ३९, रा. पुनर्वसन कॉलनी, मोर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात कार्यरत
कर्मचाऱ्याने एपीआय जमादाराने लाच मागितल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. दरम्यान, कारवाई करण्यापूर्वी लाच मागणाऱ्याने लाचेची मागणी केली किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी मागील सहा महिने एसीबीचे पथक एपीआय पालांडे चुंगडाच्या मागावर होते. अखेर एपीआय त्याच्या जमादाराने रक्कम मागितल्याचे सिद्ध झाल्यामुळे सोमवारी कारवाई केली आहे.

मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात डिसेंबर २०१४ मध्ये कोट्यवधींचा आर्थिक अपहार उघड झाला होता. या अपहार प्रकरणी डिसेंबर २०१४ मध्ये मोर्शी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा तपास मोर्शीचे एपीआय पालांडेकडे होता. तपासादरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली होती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ, मानधन, वेतन आदी कार्यालयीन कामांमध्ये आर्थिक अनियमितता होती. तसेच स्वत:चा आर्थिक लाभ व्हावा, या उद्देशाने कार्यालयातील काहींनी ही रक्कम बनावट बँक खाते उघडून त्यात वर्ग करून घेतल्याचे तपासात पुढे आले होते. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अजूनही काहींना अटक करायची आहे, असे सांगून एपीआय पालांडे जमादार चुंगडाने या प्रकरणात तुम्हाला अटक करण्यात येईल. मात्र, अटक करण्यासाठी तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये द्या, अशी मागणी पालांडे चुंगडाने तक्रारदाराला केली होती. दरम्यान, पाच लाख रुपये ही रक्कम फार मोठी आहे शिवाय प्रकरणात आपला सहभागच नसतानाही पोलिसांकडून होणारा त्रास लक्षात घेता तक्रारदाराने ११ जुलै २०१५ ला पालांडे चुंगडाविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर एसीबीने या मागणीबाबत पंचासमक्ष खातरजमा करून सोमवारी दोघांनाही पकडले. त्यांच्याविरुद्ध मोर्शी पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक डी. एन. उराडे, राहुल शिरे, एएसआय कैलास सानप, विनोद दाभने, श्रीकृष्ण तालन, पुरुषोत्तम बारड, विशाल हरणे, प्रमोद धानोरकर, विक्रम ठाकूर, अभय वाघ आणि गजानन भडांगे यांनी केली आहे
गुन्हा दाखल
^तक्रारदाराने आमच्याकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. या प्रकरणात आम्ही पंचासमक्ष या दोघांनीही पाच लाखांची लाच मागितल्याची खात्री केली. त्यानंतर सोमवारी मोर्शी ठाण्यातच त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एपीआयसह जमादाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर.बी. मुळे, पोलिस उपअधीक्षक, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...