आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या ४० नव्या बस थांब्यांच्या श्रृंखलेचा प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थानिक इर्विन चौकातील नवनिर्मित बस थांब्याचे उद््घाटन करून मनपाने ४० नवे बस थांबे वर्षअखेर पूर्ण होणार असल्याचे संकेत दिले आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी हा नवा बस थांबा लोकार्पित केला गेला.
शहर बसची ये-जा करणारे मार्ग, बसच्या वेळा, शहराचा नकाशा आदी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणारा हा थांबा आहे. शहर वाहतूक शाखेचे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा यांच्या मधोमध असलेल्या या थांब्यासारखेच आणखी ४० नवे थांबे अमरावतीत तयार होत आहे. डिसेंबरअखेर या थांब्यांची कामे पूर्ण होणार असून, त्या-त्या वेळेला ती लोकांसाठी उपलब्ध करून दिली जातील, असे या वेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला महापौर चरणजितकौर नंदा, आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, झोन सभापती मिलिंद बांबल, मनपातील विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, गटनेते संजय अग्रवाल प्रकाश बनसोड, स्थायी समितीचे सदस्य दिगंबर डहाके, परिवहन समितीच्या सभापती डॉ. िदव्या िससोदे, नगरसेवक राजू मसराम प्रा. सुजाता झाडे, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मनपाचे स्वास्थ्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

हॉकर्सही नाराज: शहरातीलहॉकर्सही पालकमंत्र्यांना भेटायला आले होते. दोन दिवसांआधी एका हॉटेलात झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील हॉकर्सच्या गाड्यांवर अंकुश आणला आहे. त्यातून सुटका व्हावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, पालकमंत्र्यांनी हॉकर्संना झिडकारल्याने ते नाराज झाले.

डहाकेंची नाराजी: नवाथेभुयारी रेल्वे मार्गाचे उद््घाटन करण्यात आले. शिवसेनेचे दिगंबर डहाके यांच्या वाॅर्डातील कार्यक्रमासाठी पालकमंत्री येतील, असे खुद्द डहाके यांनीच सांगितले होते. मात्र, त्या दिवशी तसे झाले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मला बोलावलेच नव्हते म्हणत जाहीर नाराजी प्रकट केली.

एकाच दिवशी दोनदा उद्घाटन !
पूर्वघोषित वेळेनुसार आमदार डॉ. सुनील देशमुख सकाळी ११ च्या सुमारासच कार्यक्रमस्थळी पोहोचले. तोवर मनपा पदाधिकारी अधिकारीही पोहोचले होते. मात्र, पालकमंत्र्यांना यायला बराच अवकाश असल्याने उद््घाटन कार्यक्रम सुरू केला गेला. दरम्यान, कार्यक्रम संपायच्या वेळी पालकमंत्रीही त्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे पुन्हा एकदा संयुक्त छायाचित्रे घेण्यात आली. अशा प्रकारे एकाच दिवशी या थांब्याचे दोनदा उद््घाटन केले गेले, अशी चर्चा सुरू झाली होती.
इर्विन चौकातील बस थांब्याचे उद््घाटन करताना पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख,मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार इतर पदाधिकारी.