आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात कैद्यांच्या पेशीसाठी ‘व्हीसी' चाच करावा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील मध्यवर्ती कारागृहात सध्या शिक्षा झालेले कुख्यात कच्चे कैदी शिक्षा भोगत आहेत, अशा कैद्यांना कधी स्थानिक, तर काही वेळा जिल्हाबाहेरच्या न्यायालयात तारखेवर हजर करावे लागते. कैद्यांना कारागृहातून कोर्टात आणि कोर्टातून परत कारागृहात सोडण्यापर्यंतची संपूर्ण सुरक्षा शहर पोलिसांनाच पुरवावी लागते. सराईत आणि कुख्यात टोळीतील कैद्यांना सुनावणी पेशीकरिता कारागृहाबाहेर आणल्यानंतर उद्भवणारे संभाव्य धोके आणि पोलिसांवरील सुरक्षेचा वाढता ताण लक्षात घेता आगामी काळात कुख्यात कैद्यांना पेशीसाठी प्रत्यक्ष हजर करता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’चाच वापर करावा, असे पत्र शहर पोलिसांनी कारागृह प्रशासनाला नुकतेच दिले आहे.

अमरावतीच्या कारागृहात मुंबई, पुणे, गडचिरोलीसह राज्यातील इतर ठिकाणचे कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये अनेक कुख्यात गुंडांचा, कुख्यात टोळ्यांचा समावेश आहे. त्यांना शिक्षा होईस्तोवर महिन्याच्या महिना न्यायालयातील तारखेवर हजर करावे लागते. तसेच शिक्षा लागलेल्या काही गुन्हेगारांनाही न्यायालयात हजर करावे लागते. अशा वेळी कारागृहापासून त्या कैद्याला न्यायालयात आणणे त्याची न्यायालयातील हजेरी आटोपून पुन्हा कारागृहात सोडून देणे, ही जबाबदारी शहर पोलिसांची आहे. यामध्ये अनेकदा कुख्यात गुंडांचा किंवा दरोडेखोर टोळ्यांचा समावेश असतो. अशा वेळी पाेलिसांना सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा आरोपींसाठी वापरावा लागतो. यासोबतच कुख्यात गुंड पळून जाणे किंवा अन्य काही प्रकार होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीं अमरावतीसह राज्यातील महत्त्वाच्या कारागृहात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘व्हीसी'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ही सुविधा असूनही कारागृह प्रशासन ‘व्हीसी'द्वारे कैद्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे काम पूर्ण करीत नाही. काही प्रकरणांमध्ये ‘व्हीसी'चा वापर करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षकांनी सांगितले. यापूर्वीसुद्धा शहर पोलिसांकडून कारागृह प्रशासनाला यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, यापुढील काळात कारागृहाने प्रत्येकच कुख्यात गुंडांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगचा वापर करावा, या आशयाचे पत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आगामी काळात कारागृह प्रशासन कुख्यात गुंडांच्या न्यायालयीन तारखेसाठी नेहमीच ‘व्हीसी'चा वापर करतील, अशी अपेक्षा आहे.

{पोलिसांना चकमा देऊन कैदी पसार होऊ शकतो. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत.
{प्रवासादरम्यान, एखादेवेळी कैदी पळून जाऊ शकतो.
{बाहेरगावी जाताना रात्रीच्या प्रवासात कैदी पलायन करू शकतो.
{टोळीयुद्धातील कैदी बाहेर काढल्यानंतर विरुद्ध गटाकडून हल्ला होऊ शकतो.
{कुख्यात गुंडांच्या सुटकेसाठी पोलिसांवरही होऊ शकतो हल्ला