आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासिका प्राध्यापकांच्या मुलाखती त्वरित रद्द करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून राबवण्यात येत असलेली तासिका प्राध्यापकांची मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. जनता दल संघर्ष युवा संघटनेच्या वतीने कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांना मंगळवारी (दि.७) निवेदन देण्यात आले. तासिका प्राध्यापकांची निवड करताना सामाजिक आरक्षण लागू करण्याची मागणीदेखील करण्यात आली. याकडे दुर्लक्ष करीत निवड प्रक्रिया राबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
मागासवर्गीयांनाडावलण्याचा विरोध : संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील विविध २४ विभागांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची निवड प्रक्रिया राबवली जात आहे. किमान ३०० तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या करावयाच्या असल्याने प्रक्रिया जुलैपासून आरंभ करण्यात आली असून, जुलै रोजी देखील मुलाखती घेतल्या जाणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या जून १५ च्या जाहिरातीत सामाजिक आरक्षणाबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. शिवाय अमरावती विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर जुलै रोजी शुद्धिपत्रक काढत सामाजिक आरक्षणाला बगल देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने एक प्रकारे मान्य केले.
विद्यापीठाकडून शुद्धिपत्रक काढण्यात आले असले तरी मागासवर्गीय उमेदवारांना पुरेशी वेळ मुलाखतीची तयारी करण्यासाठी मिळणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे तासिका प्राध्यापकांच्या निवडीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होईल, हे मात्र निश्चित आहे. सामाजिक आरक्षणाला बगल देणाऱ्या या धोरणाचा िनषेध करण्यात आला.सकाळी ११.३० च्या सुमारास जनता दलाचे कार्यकर्त विद्यापीठात धडकले. मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी सरचिटणीस अॅड. नंदेश अंबाडकर, मोहन खंडारे, रमेश खोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सामाजिक आरक्षण लागू करीत तासिका प्राध्यापकांच्या निवडीबाबत नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी संघर्ष युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. विद्यापीठाकडून पूर्वीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर सामाजिक आरक्षणाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तासिका प्राध्यापकांच्या निवडीत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होणार असल्याचे स्पष्ट आहे.
पाचही जिल्ह्यातून उमेदवार येत असताना लांबचा प्रवास, जाण्या-येण्याचा येणारा खर्च, राहण्याची व्यवस्था मुलाखतीची तयारी करण्यास वेळ लागतो. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांबाबत तासिका प्राध्यापकांची मुलाखत घेताना कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. यावरून मर्जीतील लोकांना तासिका प्राध्यापक पदावर संधी देण्याचे हे षड््यंत्र असल्याने दिसून येत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना डावलण्यात येत असल्याने मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याची गरज आहे.
सामाजिक आरक्षण लागू करीत तासिका प्राध्यापकांची नियुक्ती करणे हे गंभीर प्रकरण आहे. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, जिल्हाध्यक्ष राजेश गोफणे, सुनील वंजारी, मंजीष खोडे, रणजित बसवनाथे, रितेश खंडारे, मंगेश पवार, दिलीप लाडे, रमेश बसवनाथे आदी उपस्थित होते.

मागासवर्गीय संघटना झाल्या आक्रमक
संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तासिका प्राध्यापकांच्या निवडीबाबत अनेक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. याशिवाय विविध सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठात येत अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक संघटना गुरुवारी विद्यापीठात धडकण्याची शक्यता आहे.