आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅनलाइन फसवले, पोलिसांनी हसवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हॅलो,मी बँकेतून बोलतो, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. तुम्हाला नवीन कार्ड द्यायचे आहे, त्यामुळे मला तुमच्या एटीएमवरील १६ अंकी क्रमांक सांगा. या स्वरूपाचे कॉल करून अनेक खातेधारकांना गंडा घालणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संबंधित फोन करणाऱ्याला १६ अंकी क्रमांक सांगितला की, आपण फसलो म्हणून समजा. परंतु, खातेदाराची जागरूकता तत्परतेमुळे फसगत झालेली रक्कम परत मिळू शकते. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका प्राध्यापकाच्या बँक खात्यातून आॅनलाइन उडवलेले ३४ हजार ६०० रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.

बँक अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएम कार्डमध्ये अडचण आली आहे. ते ब्लॉक झालेले आहे, तुम्हाला नवीन एटीएम कार्ड द्यायचे आहे. अशा नानाविध सबबी पुढे करून नागरिकांना फसवण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. याच पद्धतीने शहरात राहणाऱ्या एका प्राध्यापकाला शनिवारी (दि. १९) दुपारी वाजता फोन आला. बँकेतून बोलतो आहे, तुमच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक सांगा, असे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकाने हा क्रमांक सांगितला. त्यानंतर पुन्हा त्याने कार्डवरील मागे असलेला चार अंकी सीव्हीव्ही क्रमांक मागितला, प्राध्यापकानेसुद्धा दिला. ही प्रक्रिया सुरूच असताना प्राध्यापकाच्या मोबाइलवर एक एसएमएस आला. या क्रमांकामध्ये आलेला ओटीपी क्रमांक सांगा, असे त्याने सांगितले. तो क्रमांक प्राध्यापकाने त्याला सांगितला. या ओटीपीच्या (वन टाइम पासवर्ड) आधारे त्या व्यक्तीने प्राध्यापकाच्या उर्वरितपान

पोलिसांशी संपर्क करावा
^शहरातील एका प्राध्यापकाची ऑनलाइन फसवणूक झाली होती. त्यांनी तातडीने ठाण्यात येऊन माहिती दिली. त्याआधारे आम्ही त्यांना प्रक्रिया सांगून संबंधित कागदपत्रे बँकेच्या पासबुकच्या नोंदी मागितल्या. त्याआधारे कंपनीला ई-मेल केला.शनिवारीही रक्कम परत मिळाली. रवीराठोड, सहायक पोलिस निरीक्षक, राजापेठ.

^फोन किंवा मोबाइलवरून आपण आपल्या बँक खाते किंवा एटीएमची माहिती कोणालाही देऊ नये. तसेच ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना घटनाक्रम सांगावा., यासंदर्भात तांत्रिक मार्गाने रक्कम परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. शिवाभगत, ठाणेदार, राजापेठ पोलिस स्टेशन.