आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलदऱ्यात ‘रोप वे’ आणि ‘स्काय वॉक’ प्रकल्प,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे लवकरच ‘रोप वे’ आणि ‘स्काय वॉक’ या दोन सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात रोपवे आणि स्काय वॉक चा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार आनंदराव अडसुळ यांनी दिली आहे.
पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले हे दोन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता या प्रकल्पांच्या प्रस्तावित कामाला प्राथमिकता द्यावी असे अडसूळ यांनी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे. चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉंईंट पर्यंत स्काय वॉक चा हा प्रकल्प प्रस्तावीत करण्यात आला आला आहे.
दोन मोठया टेकड्यांना स्काय वॉक ने जोडण्यात येईल. तर याच भागात रोप वे ची सुविधा सद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्काय वॉक च्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील
चिखलदरा हा भाग सिडको द्वारा विकसीत करण्यात येत आहे.
गाविलगड किल्ल्याची दुरुस्ती : केन्द्र सरकारच्या निधीतून चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्याची दुरूस्ती करण्यात येत आहे. तीन वर्षांपुर्वी किल्ल्यांच्या दुरूस्तीकरीता सुमारे एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. या रकमेतून गाविलगड किल्ल्याचा परकोट आणि दिल्ली दरवाजाची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.

विकास आराखडा अंतिम टप्प्यात
चिखलदरा पर्यटन विकास आराखड्याची अधिसुचना २००८ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या नुसार सुमारे ८३५ कोटी रूपयांचा प्रकल्प विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडे या आराखड्याला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आराखड्याबाबत काही सुचना मागाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्काय वॉक कसा असवा याबाबत अडसूळ यांनी सिडको कडे सुचना केल्या आहेत. विदेशातील धर्तीवर स्काय असावा अशी सुचना अडसूळ यांनी केली आहे. चिखलदरा येथे होणारा स्काय वॉक हा काचेचा असावा असे अडसूळ यांचे म्हणणे आहे.