आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगावच्या मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - शहरातील विविध समस्यांच्या निपटारा करण्याऐवजी येथील नगर परिषद प्रशासन अन्य कारणांमुळे चर्चेत आहे. नगर परिषदेमधील अनधिकृत कामांना आळा घालणाऱ्या प्रफुल्ल लोळे यांना बाजूला सारून गैरकारभारी अतिरिक्त अभियंता मनीष चोमवाल यांना पुन्हा अभियंता म्हणून पदभार सोपवण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिला आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या दोन वर्षांपासून कुठलीही विकास कामे झाली नाहीत. नियमित कर भरल्यानंतर अद्याप नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासनाच्या नियमांना डावलून नगर परिषदेच्या हद्दीत नसणाऱ्या अकृषक केलेल्या भूखंडांवर मोठे व्यवहार करण्यात आले, तर आरक्षित असलेले भूखंड अनधिकृतपणे आरक्षणमुक्त करण्यात आले. कामावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची देयकेही अशाचप्रकारे काढण्यात आली आहेत. जी कामे झाली आहेत ती अनधिकृत असून त्यांचा दर्जाही खालावलेला आहे. तत्कालीन अभियंता मनीष चोमवाल यांनी मुख्याधिकारी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरकारभाराचा कळस गाठला. नगर सेविका सुनीता मुरकुटे यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मुरकुटे यांच्या तक्रारीची दखल घेत
शीतयुद्धाला सुरुवात काही महिन्यांपूर्वीच प्रफुल्ल लोळे यांना कायम अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी अनधिकृत बांधकामांना आळा घातला होता. त्यामुळे पदाधिकारी अधिकारी यांच्यामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली, तत्कालीन अभियंता मनीष चाेमवाल यांची बांधकाम विभागात अतिरिक्त अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
चाेमवालयांची बांधकाम विभागात अतिरिक्त अभियंता म्हणून नियुक्ती केल्यानंतर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पंच कमिटीच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या अभियंता पदाचा चार्ज चाेमवाल यांना देण्याचे आदेश लोळे यांना दिले. सर्व प्रकार माहित असतानाही मुख्याधिकारी बोरकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही
नगरपरिषदेमध्ये सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्याभोवती जे संशयाचे जाळे विणले आहे, त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, यावर मी काहीही बोलू शकत नाही, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

नागरिकांनी केला प्रश्न
चोमवालयांना बाजूला सारून लोळे यांच्याकडे पदभार दिल्यानंतर सर्व अधिकृत सुरळीत चालले असताना मुख्याधिकारी यांनी पुन्हा चोमवाल यांच्याकडे पदभार सोपवण्याचा आदेश दिल्याने लोळे यांच्या कार्यकाळात योग्यरीतीने कामकाज सुरू असताना त्यांना का हटविण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.