आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Comment On Farmer Loss, Cotton Compensation

नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांनाही मदत देऊ- मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री अमरावती येथे आले असताना बेलोरा विमानतळावर त्यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीतही कापसाचे उत्पादन चांगले झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरडवाहू पिकांना राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने मदत जाहीर केली आहे. त्यात कापूस उत्पादकांचा समावेश नाही. या मुद्द्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी ३, ५७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याने केद्राकडे ४,२०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. १००० कोटी रूपयांचा निधी कमी मिळाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत शासन अाहे.

बहुवार्षिक फळ पिकांकरिता
मागीलवर्षी ‌‌‌‌~१२,००० प्रतिहेक्टर देण्यात आली होती, तर या वर्षी ~१८,००० प्रतिहेक्टर मदत दिली आहे.

ओलिता खालील शेतीसाठी
मागील वर्षी प्रति हेक्टर ‌‌‌‌‌‌‌~९००० मदत देण्यात आली होती, तर या वर्षी शासनाने ~१३५०० प्रतिहेक्टर दिलेली आहे.

कोरडवाहू शेतीसाठी
मागीलवर्षी ~४५०० प्रतिहेक्टर मदत दिली होती, तर या वर्षी वाढ करून ~६८०० प्रति हेक्टर एवढी मदत दिली आहे. (रूपये कोटीमध्ये)

मागील वर्षी ५० टक्के त्यापेक्षा अधिक झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी मदत दिली होती, या वर्षी शासनाने ३३ टक्के त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेत पिकांसाठी मदत जाहीर केली आहे.

मदतीचे वाटप करण्याचे निकष केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचे हे निकष सर्व राज्यांसाठी लागू आहेत. त्याच निकषा नुसार या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.

हे आहेत निकष
१.खरीप हंगामातील ७/१२ उताऱ्यावर असलेल्या नोंदीच्या आधारे मदत
२. पिकनिहाय पैसेवारीच्या आधारे कापसाव्यतिरीक्त अन्य कोरडवाहू पिकांचे ३३% नुकसान ग्राह्य धरण्यात येईल.
३. बहुवार्षिक फळपिके बागायती पिके यांचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा होईल.
४. बहुवार्षिक आणि बागायती करीता जीपीएस तंत्रज्ञानाने घेतलेल्या पिकांच्या फोटोसह पंचनामे होणार.
५. नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळणार