आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियमितता असलेल्या शाळांची होणार तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांच्याशी चर्चा केली. - Divya Marathi
आमदार बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांच्याशी चर्चा केली.
अमरावती - अनियमितता असलेल्या नामांकित खासगी शाळांची तपासणी होणार असल्याचे संकेत आहे. आमदार बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांची भेट घेतल्यानंतर अनेक शाळांविरोधात प्रवेशाबाबत तक्रारी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

अामदारांसोबत झालेल्या भेटीनंतर अनियमितता असलेल्या शाळांवर कारवाईबाबत तपासणी केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांची स्पष्ट केले. ज्ञानमाता हायस्कूल येथील प्रवेशावरून प्रहार सामाजिक संघटना शिक्षणाधिकारी कार्यालयाचे मागील अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. ज्ञानमाता हायस्कूलमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश करण्यात आल्याचे प्रहारचे म्हणणे आहे. यासह विविध विषयाला घेऊन माहिती अधिकारात शिक्षणाधिकारी कार्यालयात अर्जदेखील दाखल केला. मात्र, शिक्षण विभागाकडून माहिती दिली जात नसल्याने आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ६) शिक्षणाधिकारी कार्यालयात भेट दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. श्रीराम पानझडे यांच्या कक्षात आमदारांची बैठक झाली. यादरम्यान शहरातील अनेक शाळांमध्ये पहिलीतील प्रवेशामध्ये अनियमितता असल्याचेदेखील निदर्शनास आणून दिले. त्यावर अनियमितता करणाऱ्या शाळांची तपासणी केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, रवींद्र वैद्य, चंदू खेडकर अादी उपस्थित होते.