आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे पुन्हा वर्चस्व कायम, कृउबासच्या १८ जागा जिंकून एकहाती सत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे- येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने १८ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज करत बाजार समितीवर पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
खरेदी विक्री संघाच्या आनंद सभागृहात मतमोजणी पार पडली. विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे अशोक चौधरी, प्रदीप वाघ, रवींद्र देशमुख, प्रभाकर वाघ, प्रदीप जगताप, अतुल चांडक, मंगेश धावडे , सुनीता काळमेघ, सविता देशमुख, प्रवीण घुईखेडकर, रमेश महात्मे , वैशाली ठाकरे ,रविकांत देशमुख, हरिभाऊ गवई, भानुदास गावंडे, पुरुषोत्तम मुंधडा, राजकुमार जालान ,प्रदीप गुजर यांचा समावेश आहे.

निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विजयी मिरवणूक काढली. गुलाल उधळून,ढोल ताशांच्या गजरात विजयी जल्लोष केला. विधानसभेनंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत काँग्रेसने विरोधकांवर चांगलीच मात केल्याने काँग्रेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

काँग्रेसने केला विजयी जल्लोष
आमदारप्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पॅनेलने यंदाच्या निवडणुकीत कृउबासवर झेंडा फडकावत आपली सत्ता कायम ठेवली. िवजयी झालेल्या संचालकांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात, गुलाल नीळ उधळत शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणार
^कृउबासच्यानिवडणुकीत झालेला पराभव आम्ही स्वीकारत आहोत. एक शेतकरी उद्योजक म्हणून या निवडणुकीत सहभागी झालो होतो. अपयश आले, परंतु यानंतरही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत राहू. दिलीप गिरासे

यांनी पाहिले काम
निवडणूकनिर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक धोपे सहकार अधिकारी कावडकर, व्ही. आर. गायकवाड, ए. डी. दहीकर, डी. बी. वाघमारे, व्ही. बी. लेंडे, टेकाडे, डी. बी. चांभारे, शिल्पा कोल्हे यांनी मतमोजणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली.