आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई कामगारच बनणार आता कचऱ्याचे कंत्राटदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कचरा उचलणारा सफाई कामगारच जर त्या कचऱ्याचा कंत्राटदार असेल तर किती बरे होईल. काही काळासाठी स्वप्नवत वाटणारी ही बाब लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. मनपा आयुक्त गुडेवार यांच्या कल्पनेतून ही नवी यंत्रणा उभी ठाकणार असून, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

महापालिकेच्या सर्व ४३ वाॅर्डांमधील कचरा गोळा करण्याचे कंत्राट या महिन्याच्या शेवटी संपुष्टात येत आहेत. त्यामुळे निविदा प्रकाशित करून पुन्हा वर्षभरासाठी नवी यंत्रणा निवडावी लागणार आहे. असे करताना जुन्याच संस्था पुन्हा निवडल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या संस्था-संघटनांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने नवी यंत्रणा उभी करणे मनपासमोर मोठे आव्हान आहे.

यावर नामी तोडगा म्हणून सफाई कामगारांनाच कंत्राटदार म्हणून नेमायचे, असा आयुक्तांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सध्या सफाई करत असलेल्या कामगारांनी एकत्र यायचे आणि स्वत:चीच संस्था तयार करून त्या आधारे सफाईचा कंत्राट घ्यायचा, असे आयुक्तांचे सूत्र आहे. या सूत्रासाठी आवश्यक असलेले तांत्रिक साहाय्य पुरवण्याची तयारीही मनपा प्रशासनाने केली आहे. नाल्यांमधील कचरा बाहेर काढणे आणि घंटी कटल्याच्या आधारे घराघरांमधील कचरा गोळा करणे ही कामे सध्या मनपा कंत्राटदारांमार्फत संयुक्तपणे केली जातात. त्यासाठी कंत्राटदारांचे ११७० आणि मनपाचे ६५० असे १८२० कामगार शहरभर काम करतात. ही संख्या सर्व वाॅर्डांमध्ये समसमान िवभागून घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक वाॅर्डामध्ये कंत्राटदाराची २७ आणि मनपाची १४ माणसे कामे करतात, अशी सध्याची स्‍थिती आहे.
प्रभागनिहाय विभागलेल्या कंत्राटदारांच्या २७ सफाई कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संस्था स्थापन केली तर नवे कंत्राट अगदी सहजतेने त्यांना दिले जाऊ शकतात, असा मनपा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यासाठीची जुळवाजुळव सुरू असून, तांत्रिक मार्गदर्शनासाठी मनपा स्वत:च त्यांना मदत करणार आहे.
नागरिकांच्या तक्रारीही टळतील : सध्यासर्वाधिक तक्रारी साफसफाईबाबतच्या असतात. सेवा व्यवस्थित नाही म्हणून सामान्य नागरिक तर तक्रारी करतातच. कंत्राटदारांच्या वागणुकीबाबत खुद्द काही कामगारांच्याही तक्रारी असतात. नव्या प्रयोगामुळे हे सर्व टळणार असून, संस्था स्थापन करावयाची असल्याने सफाई कामगारांनाही एक नवा आयाम मिळणार आहे.

१११२ आॅगस्टला कार्यशाळा : हा नवा प्रयोग अस्तित्वात आणण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ११ १२ ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे. महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित ही कार्यशाळा दुपारी वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी शिक्षण समितीचे सभापती अब्दुल रफीक, उपसभापती इमरान अशरफी, महापौर चरणजितकौर नंदा, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेते बबलू शेखावत, नगरसेवक प्रा. प्रदीप दंदे, अरुण जयस्वाल आदींच्या प्रभागातील सफाई कामगार, बिट प्यून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून, उर्वरित प्रभागातील कामगार-अधिकाऱ्यांची कार्यशाळा दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्टला घेतली जाणार आहे. त्यासाठीची तयारी आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी करत आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कसे असेल मनुष्‍यबळ..