आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट बसस्थानकाचा मुहूर्त राजापेठेत कधी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या महामंडळाचे राजापेठ येथील कॉर्पोरेट बसस्थानक पूर्ण होऊन केवळ उद्घाटन तारखेच्या प्रतीक्षेत या स्थानकाचा मुहूर्त अडकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्थानकाचे उद््घाटन होणार आहे. फडणवीस यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने या स्थानकाचा मुहूर्त आणखी लांबणीवर पडण्याचे संकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, नागपूर येथील नामांकित बिल्डरने हे स्थानक बांधले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद््घाटनाला यावे, यासाठी हे बिल्डर प्रयत्नात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सीएमआे कार्यालयातून यापूर्वी दोनदा या स्थानकासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री प्रवीण पोटे उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहतील. परंतु, उद्घाटनाला येणाऱ्या मान्यवरांची तारीख मिळत नसल्याने या स्थानकाचा मुहूर्त आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, यापूर्वी विविध तांत्रिक फेऱ्यात या स्थानकाचे काम अडकले होते. सध्या काम पूर्ण होऊनही केवळ लोकप्रतिनिधीच्या उद्घाटनासाठी हे स्थानक सुरू व्हायचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

‘दिव्य मराठी’चा सातत्याने पाठपुरावा
राजापेठ बसस्थानकासंदर्भात ‘दिव्य मराठी’कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एप्रिल २०१५ मध्येच हे स्थानक सुरू होणार होते. परंतु, स्थानकाचे काम पूर्ण होऊनही विविध तांत्रिक अडचणींमुळे या स्थानकाचा मुहूर्त लांबणीवर गेला. स्थानकाचे बांधकाम, महापालिकेकडून मिळणारे वापर दाखला प्रमाणपत्र अशा विविध अडचणींसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले.

लवकरच होईल कार्यान्वित
^१३ऑक्टोबरला हे स्थानक सुरू होणार होते, हे बरोबर आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे मुहूर्त लांबणीवर गेला आहे. लवकरच हे स्थानक कार्यान्वित होईल. शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. के.एम. महाजन, विभागीय नियंत्रक.

अधिकाऱ्यांच्या निव्वळ पोकळ वल्गना ठोस कारवाई नाही
कुठल्याही परिस्थितीत हे स्थानक घटस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या त्या केवळ पोकळ वल्गना असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. स्थानक सुरू करण्यासंदर्भात दिव्य मराठीने १२ ऑगस्टला वृत्त प्रकाशित केले होते. त्या वेळी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून एका महिन्यात हे स्थानक सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. एका महिन्यानंतर पुन्हा १२ सप्टेंबरला हे स्थानकासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्या वेळी एका महिन्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी स्थानक कार्यान्वित होईल,.