आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस ४,४०० रुपयांवर, किरकोळ भाववाढीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील दोन-तीन दिवसांत कापसाच्या दरात किरकोळ वाढ झाल्याने दुष्काळी परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीनला जबर फटका बसल्यानंतर तुरीचेही पीक समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता कापसाच्या पिकावर टिकून आहेत. कापसाच्या दरात दीडशे ते दोनशे रुपये वाढ होऊन जिल्ह्यातील विविध खासगी खरेदीदारांकडून कापसाला सरासरी ४२०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. परंतु जिल्ह्यातील विविध तालुक्यांतही खासगी खरेदीदारांच्या भावात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याने गरजू शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनला जबर हादरा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनकडून समाधानकारक उत्पन्न मिळू शकले नाही. सरासरी एकरी एक ते दोन पोतेही उत्पादन झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. सध्या तुरीचे भाव तुलनेने समाधानकारक असले तरी तुरी अचानक वाळल्याने उत्पादन चांगले होण्याची आशा मावळली आहे. दरम्यान, जमिनीत ओलावा थंडी नसल्यामुळे हरभऱ्याचेही पीक जेमतेम असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या आशा कापसावर टिकून आहेत. त्यातच मागील आठवड्यापर्यंत कापसाचे भाव सरासरी ४१०० रुपयांवर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. दरम्यान, मागील दोन तीन दिवसांपासून कापसाच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ झाली असून उर्वरितपान

निर्यातीची व्हावी घोषणा किरकोळ दरवाढ झाली
^रूईसरकीच्यादरामध्ये देश-िवदेशातील बाजारपेठेत वाढ झाली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून, कापसाच्या भावात किरकोळ दरवाढ झाली आहे. नवलकिशोर मालपाणी, व्यापारी,अमरावती.

^सरकी, ढेपेचीमागणी वाढली आहे. देशात कापड उद्योगाला किमान अडीच कोटी गाठींची गरज आह. परंतु देशात उत्पादन साडेतीन कोटी गाठींची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने िनर्यातीची घोषणा केल्यास कापसाची दरवाढ होऊ शकते. संजय जयस्वाल, जयस्वालिजनींग प्रेसिंग, परतवाडा.

शासनाने निर्यात बंद करू नये
^कापसाची निर्यातवाढल्याने तेजी आली आहे. निर्यातीस अधिक चालना दिली गेल्यास भाव आणखी वाढू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र शासनाने िनर्यात बंद करू नये. सजंय हाडोळे, जेडीएसजिनिंग प्रेसिंग, अंजनगाव सुर्जी.

निर्यात वाढल्यास फायदाच
^सरकीच्या दरातवाढ काही प्रमाणात निर्यात सुरू झाल्याने दर वधारले असून, निर्यात वाढल्यास आणखी भाव वाढतील. सुधाकर भारसाकळे, संचालक,सद््गुरू जिनींग, प्रेसिंग, दर्यापूर.

कॉटन फेडरेशन ६५७.५७
सीसीआय २२३०५.७०
खासगी ८६५५२.३०
खासगी बाजारात असे आहेत भाव
शहर कमाल
अमरावती ४४००
परतवाडा ४३५०
वरूड ४२५०
दर्यापूर ४३००
धामणगाव रे. ४१६५
गुजरातमधील भाव
अहमदाबाद ४५५०
मेहसाना ४६००
राजकोट ४५५०
पाटन ४४५५
दिसा ४४१०
हरयाणातील भाव
भिवानी ४५२५
आदमपूर ४३८५
फतेहबाद ४३८०
जींद ४४१४
उचाना ४३९६

बातम्या आणखी आहेत...