आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदाराला दिली जीवे मारण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव खंडेश्वर - अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीसंदर्भात जप्त केलेल्या ट्रकचे टायर बदलवण्यास तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ यांनी परवानगी दिल्याने संतप्त झालेल्या ट्रकचालक सुनील देशमुख याने तहसील कार्यालयातील कागदपत्रांची फेकफाक करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुखला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. १६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

अनिल देशमुख यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४०/५८१४) महिनाभरापूर्वी वाळूची अवैध वाहतूक करताना जप्त करण्यात आला. दंडाची रक्कम भरल्यामुळे हा ट्रक तहसील कार्यालयातच उभा होता. दरम्यान त्याचे टायर खराब होत असल्याने सोमवारी अनिलचा भाऊ सुनील देशमुख याने तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार वाहूरवाघ यांना टायर बदलवण्यासाठी ट्रक देण्याची मागणी केली. त्यावर तहसीलदारांनी दंडाची रक्कम भरा अन् ट्रक घेऊन जा असे सांगताच सुनीलचा पारा भडकला. त्याने वाहूरवाघ यांना जीवे मारण्याची धमकी देत टेबलावरील कार्यालयीन कामकाजाची कागदपत्रे फेकून देत काढता पाय घेतला. तहसीलदार वाहूरवाघ यांनी याबाबत नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील देशमुख याला अटक केली. पुढील तपास प्रभारी ठाणेदार शुभांगी आगासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.