आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत मध्‍यरात्री थरार, चंदन चोरट्यांचा एपीआयवर वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चंदन चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकावर चोरट्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो कोयत्याचा वार चुकवून सहायक पोलिस निरीक्षकाने त्या चोरट्याच्या दिशेने पिस्तूलमधून गोळी झाडली. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. हा थरार रविवारी (दि. ९) मध्यरात्री ते च्या दरम्यान तपोवन परिसरात घडला.

गाडगेनगर पोलिस ठाण्याला कार्यरत असलेले फिरोज खान उस्मान खान पठाण रविवारी रात्री ड्युटी ऑफिसर होते. रात्रीच्या सुमारास एपीआय पठाण, पोलिस कर्मचारी गजानन ठाकरे शासकीय वाहनाचे चालक पोलिस कर्मचारी निकम गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तपोवन ते बियाणी चौक मार्गावर गस्त घालत होते. त्याच वेळी एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की, एका दुचाकीवर दोन व्यक्ती चंदनाचे ओंडके घेऊन जात आहेत. त्यामुळे एपीआय पठाण त्यांचे सहकारी वाहनाने तपोवन परिसरातील संकेत कॉलनी मार्गावर त्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. मात्र, ते दिसले नाही म्हणून पोलिस वाहनासह संकेत कॉलनीमधून तपोवन चौकाच्या दिशेने येत होते. त्याचवेळी समोरून एका लाल रंगाच्या दुचाकीवर दोन व्यक्ती चंदनाचे ओंडके घेऊन जात होते.

पोलिस वाहनाच्या चालकाने त्या दुचाकीवरील व्यक्तींना थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते पळाले. त्या वेळी त्यांच्या दुचाकीसमोर वाहन घेऊन एपीआय पठाण वाहनाच्या खाली उतरले. त्यांनी दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पठाण यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, त्या वेळी पठाण यांनी तो चुकवला, त्याच वेळी त्याने पठाण यांना जोरदार धक्का देऊन पळ काढला. पठाण यांनी पुन्हा त्याला पकडले त्या वेळी त्याने पुन्हा कोयता मारला त्यांनी दुसऱ्यांदाही वार चुकवला. मात्र, पठाण जमिनीवर कोसळले. याच वेळात त्या दोघांनी दुचाकीने पळ काढला. त्या वेळी एपीआय पठाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्या चोरट्यांच्या दिशेने एक गोळी फायर केली. मात्र, ती चोरट्यांना लागली नाही. ते दुचाकीसह पसार झाले.

चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत पठाण हे किरकोळ जखमी झाले आहेत. या वेळी मात्र चंदनाचे ओंडके त्या चोरट्यांनी घटनास्थळीच टाकले होते, पोलिसांनी ते जप्त केले. पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे हेसुद्धा रविवारी मध्यरात्री गस्तीवर होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी सोमवारी पहाटे एपीआय पठाण यांच्या तक्रारीवरून दोन चोरट्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

असा होता तो मध्यरात्रीचा पाठलाग
मागील काही महिन्यांत गाडगेनगर हद्दीतून चंदन झाड चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी विभागीय आयुक्त, न्यायाधीश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानांमधून तसेच घरांमधून चंदनाचे झाडे चोरले आहे. गाडगेनगरमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहे. शहरात चंदनाचे १५० च्या आसपास झाडे होती, त्यांपैकी अनेक झाडे चोरट्यांनी लांबवले होते. संकेत कॉलनी ते तपोवन मार्गावर झालेल्या या थरारानंतर संपूर्ण आयुक्तालयातील पोलिस यंत्रणा रस्त्यावर आली. ठिकठिकाणी नाकाबंदी तपासणी सुरू झाली होती. त्या वेळी व्यंकय्यापुरा भागात असलेल्या महापौर बंगल्यासमोर पोलिसांना चंदनाचे चार ओंडके बेवारस स्थितीत पडलेले दिसले. पोलिसांनी तेसुद्धा जप्त केले आहेत. याचाच अर्थ चंदन चोरण्यासाठी दोन दुचाकींवर चार चोरटे आले असावे, असा अंदाज पोलिसांचा आहे.
वन विभागाची मदत घेणार आहोत
या प्रकरणी चोरट्यांना पकडण्यासाठी आम्ही वन विभागाची मदत घेणार आहोत. त्यांच्याकडे चंदन चोरट्यांबाबत माहिती असेल. तसेच आम्ही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.
चोरट्यांच्या दिशेने एक गोळी फायर केली
पोलिस वाहनात चालकासह एपीआय पठाणसह ठाकरे, असे तिघे जण होते. एक दुचाकी समोरून येत असल्याचे दिसताच त्याला थांबण्याचा इशारा पोलिस चालकाने दिला. मात्र, ते थांबले नाही त्याचवेळी एपीआय पठाण यांची वाहन थांबण्यापूर्वीच चोरट्यांच्या दुचाकीवर मागून झेप घेतली. पोलिस असल्याचे लक्षात येताच चोरट्याने कोयत्याचा वार केला. मात्र, पठाण खाली वाकले वार चुकवला. पुन्हा त्यांनी दुचाकीला पकडले. त्या वेळी चोरटे दुचाकीवरून खाली कोसळले. त्यामुळे पठाण सहकारी पोलिस त्यांना पकडण्यासाठी पुढे आले, तर त्या चोरट्याने पुन्हा पठाण यांच्या दिशेने कोयता फिरकावला. त्या वेळी पठाण यांनी शासकीय पिस्तूल काढून लोड करून चोरट्यांच्या दिशेने एक गोळी फायर केली तोपर्यंत मात्र चोरटे पसार झाले.