आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेवर अतिप्रसंग करून रोकड हिसकणारा गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मेळघाटसारख्यादुर्गम भागातून मजुरीसाठी आलेल्या महिलेला एकातांत गाठून एकाने तिच्यावर अतिप्रसंग केला.त्यानंतर महिलेजवळील दोन हजारांची रोकड गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी वाजताच्या सुमारास शहरातील वल्लभनगर भागात घडली. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या १८ तासांत नांदगाव पेठ पोलिसांनी गजाआड केले आहे. अनिल लक्ष्मण धुर्वे (२५ रा. मांगीया, ता. धारणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अनिल धुर्वे सध्या शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावर असलेल्या वल्लभनगर भागात मजुरी करण्यासाठी आलेला आहे. तसेच ही महिला तिचा पती याच भागातील एका ठिकाणी चौकीदारीचे काम करतात. शनिवारी दुपारच्या सुमारास ही महिला कामासाठी वल्लभनगर परिसरातच पायदळ जात होती. त्यावेळी अनिलने तिला रस्त्यात गाठून अतिप्रसंग केला. त्यानंतर दोन हजार रुपये १५ हजारांचे मंगळसूत्र घेऊन पळ काढला. महिलेने आरडाओरड केली मात्र तो पर्यंत अनिल पसार झाला होता.नांदगावपेठ पोलिसांनी त्याला बडनेरानजीकच्या गोंविदपूर गावातून रविवारी (दि. १२) अटक केली. ही कारवाई ठाणेदार अनिल किनगे, उपनिरीक्षक खुळे, गजानन बोरवाल, राजु काळे, भांबुरकर यांनी केली आहे.
दोन महिन्यात तीन गुन्हे
ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात तीन गंभीर गुन्हे घडले आहे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी हे कामासाठी आलेले होते. मात्र,त्यांची माहिती संबंधित ठेकेदारांना नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्यामुळे कामासाठी ठेवणाऱ्या अनोळखी व्यक्तींचे ओळखपत्र, त्याचा मूळ पत्ता आदी माहिती घर मालकाने किंवा जो व्यक्ती त्या लोकांना कामासाठी आणतो, त्या व्यक्तीने ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिसांकडून त्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. अनिलकिनगे, ठाणेदार, नांदगाव पेठ.