आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरूडमध्ये सिलिंडरचा भडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- येथूनजवळच असलेल्या जरूड येथील ज्ञानेश्वर गोरडे यांच्या घरी सिलिंडरचा भडका उडून लागलेल्या आगीत अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असून, ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
जरूड येथील ज्ञानेश्वर गोरडे यांच्या घरातील सिलिंडरचा सकाळी आठ वाजताच्या सुमारास भडका उडाला. गोरडे कुटुंबीयांनी त्वरित घरातून पळ काढला. काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. दरम्यान, घरात दुसरेही सिलिंडर होते. पोलिस प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने पेटलेले िसलिंडर बाहेर काढून रेतीच्या साहाय्याने िवझवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या वेळी घरात दुसरे सिलिंडरही होते. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळावर पोहोचेपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले होते. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यात गोरडे कुटुंबीयांचे अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जरूड येथील ज्ञानेश्वर गोरडे यांच्या घरात सिलिंडरचा भडका झाल्याने घराची अशी अवस्था झाली.
बातम्या आणखी आहेत...