आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकर दसऱ्याला लुटणार १० किलो ‘सोने’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अचानक आॅटोमोबाइल, रिअल इस्टेट अन् सोने बाजार वधारला असून, सेलमुळे गेल्या दोन महिन्यात संपूर्ण कपड्यांचा ठोक आणि किरकोळ व्यवसाय तेजीत राहिला. चाकरमान्यांनी दसऱ्यानिमित्त खरेदी बुकिंगसाठी बुधवारी बाजारात चांगली गर्दी केली.

आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी आधीपासूनच तरतूद करून ठेवल्यामुळे ग्राहकांची पावले आज बाजाराकडे वळतील. अमरावतीकर १० किलो सोन्याची लूट करणार, असा अंदाज सराफा व्यवसायी एकता ज्वेलर्सचे विजय मोटवानी नरेंद्र गावंडे यांनी व्यक्त केला. सध्या २७ हजार रुपये तोळा सोन्याचा भाव असल्यामुळे दागिन्यांच्या बाजारात कोट्यवधीची उलाढाल होणार तर चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या आलिशान गाड्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. त्यामुळे यंदा १०० गाड्यांचे वितरण होणार आहे. या एका महिन्यात एकूण २२० गाड्यांच्या चाव्या ग्राहकांच्या हाती दिल्या जातील. ८० टक्के फायनान्सवर काम सुरू असल्यामुळे तसेच परिश्रमात वाढ केल्यामुळे दसऱ्यानिमित्त शहरात खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुचाकी वाहनांचा विचार करता स्थिती पूर्वीच्या तुलनेत आता समाधानकारक आहे.

रिअल इस्टेट व्यवसायात पितृपक्षापर्यंत फारशी उलाढाल नव्हती, मात्र नवरात्र सुरू झाल्यानंतर घर फ्लॅट खरेदी करण्यासाठी ग्राहक सरसावले. तयार पोशाखांच्या दुकानात मात्र फारशी गर्दी नाही कारण गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सेलमध्येच ग्राहकांनी आधीच खरेदी करून ठेवली. त्यामुळे तयार पोशाखांच्या बाजारात ५० कोटींची उलाढाल झाली आहे. इलेक्ट्राॅनिक्स बाजारात एलएडी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर ग्राहक भर देत असल्याचे चित्र असल्याची माहिती तारेकर रेडिओजच्या सूरज तारेकर यांनी दिली.

सोने :१० किलो विक्रीचा अंदाज (२७,००० रु. तोळा)
तयार पोशाख :कोटींच्या साड्यांसह एकूण ५० कोटी
घर फ्लॅट :: ते १० कोटींचा व्यवसाय.
दुचाकी :१२० स्कूटर्स आणि २० मोटार सायकल्स बुकिंग.
चारचाकी :१०० गाड्यांचे वितरण, महिन्याला २२०
दरवर्षी विक्रीत वाढ

दसऱ्यामुळे चित्र पालटले
^तयार कपडे साड्यांच्या बाजारात सेलमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, आता बाजार जोरात नाही. सेलच्या कालावधीत आधीच खरेदी केल्यामुळे सणाच्या घाईत लोक कपडे खरेदी करण्यास येत नाहीत. गजाननपावडे, मालक, कृष्णा साडीज.

गेल्या पाच वर्षांत दसऱ्याला आधीच्या वर्षीच्या तुलनेत नंतरच्या वर्षी विक्रीत वाढ झाली. मंदीचा प्रभाव पडेल, अशी धकधक होती. मात्र, अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात मंदीचा प्रभाव असला तरी शहराने तारले. परिश्रमात वाढ करावी लागली. रणजितबंड, अस्पा बंड सन्सचे संचालक.

^दसऱ्यामुळे दुचाकी खरेदीदार शोरूमकडे वळले. त्यामुळे चित्र पालटले. गेल्या तीन ते चार महिन्यांची विक्री या एकाच महिन्यात होत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थिनींसोबतच गृहिणींनीही त्यांच्या सोयीसाठी अचानक मोठ्या प्रमाणावर बुकिंग केली अाहे. विनोदशर्मा, व्यवस्थापक, नंदा मोटर्स.

बातम्या आणखी आहेत...