आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपालीचा चष्मा राष्ट्रस्तरावर!, ग्रामीण भागातील विद्यार्थिनीची इन्स्पायरमध्ये भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या दीपाली घुगे या विद्यार्थिनीने कर्णबधिरांना गाणे ऐकण्यासाठी तयार केलेला चष्मा राष्ट्रीयस्तरावर पोहोचला. राज्यस्तरावर बाजी मारत आयआयटी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात दीपालीचे मॉडेल महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.
चष्म्याद्वारे होणाऱ्या स्पर्शातून कर्णबधिरांना गाणे ऐकण्याची संधी दीपालीने तयार केलेल्या मॉडेलमधून मिळणार आहे. दीपाली ही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील श्रीमती रुख्मिणीदेवी वडनेरे विद्यालयात दहाव्या वर्गात शिकते. अमरावती येथील नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिने हे मॉडेल सादर केले होते. जिल्हास्तरावर निवड झाल्याने नागपूर रविनगर येथील राज्य विज्ञान शिक्षण संस्थेत पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनीतून दीपालीच्या प्रतिकृतीची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दिल्ली आयआयटीमध्ये राष्ट्रीयस्तरावर इन्स्पायर स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या मॉडेलचा उपयोग पूर्णता किंवा जन्मत: बहिऱ्यांना ऐकण्यास मदत होऊ शकते. मानवाला कोणतीही इजा होत नाही.