आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणेटंचाईचा ग्राहकांना नाहक बसतोय भुर्दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - सध्याशहरासह तालुक्यात सुट्या नाण्यांचा तुटवड्याला व्यापारी नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दुकानदारांकडे सुटे पैसे नसल्यास एक ते पाच रुपयांपर्यंतच्या वस्तू सर्रास ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. प्रवासादरम्यान सुटे पैसे नसल्याचे सांगत वाहक आपले खिसे भरत असल्याचे चित्र सर्रास तालुक्यात पहायला मिळत आहे, परंतु या चिल्लरचा मनस्ताप मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचा या ना त्या कारणाने दररोज शहराशी संपर्क येतो. त्या वेळी होणाऱ्या पैशांच्या व्यवहारामध्ये त्यांना सुट्या पैशांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शहरात नाण्यासह पाच, दहा, पन्नास रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. स्थानिक बँकांकडून नाणे उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहक व्यापाऱ्यांना पैशंाचे व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सुटे पैसे नसणे ही ग्राहक व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्यापारी पाच ते दहा रुपये शेकड्याप्रमाणे चिल्लर घेत असल्याचे चित्र दुसरीकडे दिसून येत आहे. किरकोळ खरेदीसाठी ग्राहक दुकानात गेला की, त्याला प्रथम सुट्या पैशांची विचारणा केली जाते. ग्राहकाकडे सुटे पैस नसल्यास त्याला प्रथम सुटे पैसे आणायला सांगत दुकानदार वस्तू द्यायला नकार देतो. औषधी दुकाने, कटलरी, किराणा, उपहारगृह, भाजी विक्रेते यांच्याकडेहमखास हा अनुभव ग्राहकांना येत आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या एसटी बसने किंवा अॅाटोने प्रवास करताना नेहमी चिल्लरसाठी वाद होत असल्याचे चित्र सद्यस्थितीत तालुक्यात पहायला मिळत आहे.

प्रवाशांनाहीबसतो फटका : अनेकविद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यांच्यासह अनेक प्रवाशांना चिल्लरअभावी नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. कित्येक वेळा तर तिकिटाचे उरलेले पैसेही दिले जात नाहीत.

शंभर आिण पाचशेच्या नोटांचा वापर वाढला
^येणाराप्रत्येक ग्राहक दहा, वीस रुपयांच्या कामासाठी शंभर किंवा पाचशे रुपयांची नोट देतो. त्यात सुट्या पैशांचा तुटवडा असल्याने नाहक त्रास होवून ग्राहकांचीदेखील नाराजी होते. सचिनगुल्हाने, व्यावसायीक.

तिकीटामागे पैसे लिहून देतो वाहक
^बसमध्ये वाहक चिल्लर पैसे नसल्याचे कारण देत तिकीटामागे पैसे लिहून देतो. प्रवास संपल्यानंतर प्रवासी घाईमध्ये वाहकांकडून चिल्लर पैसे घेणे विसरून जात असल्यामुळे नाहक भुर्दंड बसतो. गुलाबरावराऊत, नागरिक.

सुटे पैसे द्या, अन्यथा वस्तू घ्या
कित्येकदा दुकानात वस्तू घ्यायला गेलेल्या ग्राहकाला प्रथम दुकानदाराकडून सुट्या पैशांची विचारणा केली जाते. सुटे पैसे नसल्यास चॉकलेट, पेन किंवा पाच-दहा रुपयांपर्यंतची वस्त्ू दुकानदार ग्राहकांच्या मस्तकी मारतात.

नागरिकांनी व्यक्त केला रोष : भाजीविक्रेते, दुकानदार, औषध विक्रेते, कंडक्टर यांच्याकडेच जर सुटै पैसे नसेल, तर प्रत्येक वेळी आम्ही तरी कुठून आणणार असा सवाल करत अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.