अमरावती - अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक साेमवार, २३ नोव्हेंबरला होणार आहे. सर्वाधिक संचालक निवडून आल्याने अध्यक्षपद प्राथमिक शिक्षक समितीला मिळणार आहे. मात्र, उपाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षक बँकेला प्रगतीकडे नेण्याची जबाबदारीदेखील नवीन पदाधिकाऱ्यांवर येणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अन्य शिक्षक संघटना एकीकडे, तर प्राथमिक शिक्षक समिती एकीकडे, अशी स्थिती बँकेच्या निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला सभासदांनीदेखील भरभरून मतदान केले आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल १० संचालक समितीचे निवडून आले आहेत. एकूण संचालकांची संख्या २१ असल्याने बहुमतालादेखील ११ संचालकांची गरज आहे. प्राथमिक शिक्षक समितीला बहुमतासाठी केवळ एकाच संचालकाची गरज आहे. शिवाय, पॅनलमध्ये अन्य संघटनांचे पदाधिकारीदेखील निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीवर सभासदांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या समता पॅनलला संधी दिली होती. मध्यंतरी फाटाफूट झाल्याने बँकेत एका गटाचा अध्यक्ष, तर दुसऱ्या गटाचा उपाध्यक्ष, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, मतदारांनी पुन्हा प्राथमिक शिक्षक समितीला संधी दिली आहे. मात्र, या वेळेसदेखील घोडेबाजार किंवा संचालकांकडून नैतिकता पाळण्यात आल्यास याचा चुकीचा संदेश सभासदांमध्ये जाण्याची शक्यता आहे. सत्तेसाठी नैतिकता पाळणाऱ्या माजी अध्यक्ष विलास देशमुख यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांच्याकडून याबाबत १६ नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. प्रगती पॅनलमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक महामंडळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा समावेश आहे.
असा आहे कार्यक्रम
नामांकन स्वीकारणे दु. ते १.१५
नामांकन यादी प्रसिद्ध दु. १.१५
नामांकन छाननी दु. १.१५ ते १.३०
वैध अर्ज यादी प्रसिद्ध दु.१.३०
नामांकन मागे दु.१.३० ते १.३५
अंतिम यादी दु. १.३५
गरज पडल्यास मतदान दु.१.४० ते
मतदानानंतर मतमोजणी
संघटनानिहाय संख्याबळ
महाराष्ट्रराज्य प्राथमिक शिक्षक समिती १०
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळ संघटना
महाराष्ट्र राज्य जि. प. कर्मचारी युनियन
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ
पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख सभा
कास्ट्राइब शिक्षक संघटना
संचालक देवदर्शनाला
अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रगती पॅनलचे सर्व संचालक देवदर्शनासाठी अमरावतीबाहेर गेले आहेत. निवडणुकीपूर्वी सर्व संचालक अमरावतीत पोहोचणार आहेत. प्रगती पॅनलमध्ये फाटाफूट होऊ नये, याबाबतदेखील दक्षता घेतली जात आहे.