आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना विस्तार अधिकाऱ्यास पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वैद्यकीयरजेचे बिल मंजूर करण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) दुपारी रंगेहात पकडले. मुरलीधर रामभाऊ दिंडोकार (५१, रा. केशवनगर, अंजनगाव सुर्जी) असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव असून, ते दर्यापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

तक्रारदार व्यक्तीला वैद्यकीय रजेचे बिल मंजूर करून घ्यायचे होते. दरम्यान, सदरचे बिल मंजूर करून देतो, यासाठी कनिष्ठ लेखा सहायकांना देण्यासाठी दिंडोकार यांनी तक्रारकर्त्याला ५०० रुपयांची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने १९ नोव्हेंबर रोजी दिंडोकार यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. दरम्यान, विस्तार अधिकारी दिंडोकार यांची पडताळणी केली असता, त्यांनी तक्रारदाराकडे जांभळे यांना देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जांभळे यांचीही पडताळणी करण्यात आली. तथापि, विस्तार अधिकारी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यासाठी पथकाने सापळा रचला. दर्यापूरच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातच दिंडोकार यांना ही रक्कम घेताना पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ही अमरावती परिक्षेत्राचे एसीबीचे पोलिस अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक विलास देशमुख, पोलिस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन भातकुले, राहुल तसरे, पूजा खांडेकर, राजवंत आठवले, पोना ठाकूर, अक्षय हरणे, गजेंद्र पाडेकर, धीरज बिरोले, सुनील वऱ्हाडे, अभय वाघ जाकीर खान यांनी केली. भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी नोंंदवण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.