आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवींच्या दोन्ही मंदिरांचे मोजमाप सुरू, विश्वस्त धास्तावले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचेचनव्हे, तर संपूर्ण वदिर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरादेवी अंबादेवी मंदिराचे मोजमाप महापालिकेने सुरू केल्याने विश्वस्त धास्तावले आहेत. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी सुरू झालेले मोजमाप उशिरा सायंकाळपर्यंतही सुरूच होते.

आयुक्तांच्या निर्देशानुसार नगररचना (एडीटीपी) बांधकाम या दोन्ही विभागांची संपूर्ण यंत्रणा या मोजमाप अभियानात व्यग्र करण्यात आली असून, गुरुवारी दुपारपर्यंत याबाबतचा अहवाल तयार होणार आहे. या अहवालात किती बांधकाम वैध आणि किती अवैध, याचाही खुलासा होणार आहे. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार १९५० नंतर मंदिराच्या एकूण रचनेत झालेल्या संपूर्ण बदलाच्या नोंदी घेतल्या जाणार असून, त्याद्वारे ‘दूध का दूध-पानी का पानी’ होणार आहे.

विश्वस्तांची घरेही मोजली जाणार : दोनप्रमुख मंदिरांमधील या भांडणाचा वेध घेत असतानाच आयुक्तांनी दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांच्या घरांचेही मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. या मोजमापानंतर मंदिराचे व्यवस्थापन चालवणारे विश्वस्त खरेच देवीच्या सच्चा भक्तांसारखे नियमानुकूल वागतात की चुका करतात, हेही पुढे येणार आहे.

त्वरित देणार अहवाल
दोन्ही मंदिरांचे मोजमाप पूर्ण झाल्यानंतर बांधकामाची वैधता-अवैधता यावर शिक्कामोर्तब केले जाईल. ही प्रक्रिया अत्यंत तीव्र गतीने पुढे नेत उद्या (गुरुवार) दुपारपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर दोन्ही मंदिरांच्या मोजमापासंबंधीचा विस्तृत अहवाल न्यायालयाला पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाणार आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, महापालिका.
बातम्या आणखी आहेत...