आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापण्या पाणावल्या: मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर तालुक्यामधील दारापूर या खेडेगावात लहानाचे मोठे झालेले दादासाहेब उर्फ रा.सू.गवई यांनी केवळ जनसामान्यांच्या बळावर देश-विदेशात नावलौकिक मिळवला. अशा या अजातशत्रू नेत्याच्या निधनामुळे जिल्ह्यातील सर्वच समाजघटकांच्या पापण्या पाणावल्या आहेत.

रमेश बुंदेले, आमदारभाजप, दर्यापूर मतदारसंघ.
अॅड.यशोमती ठाकूर, आमदारकाँग्रेस, तिवसा मतदारसंघ.
श्रीकांत देशपांडे, आमदारशिक्षक मतदारसंघ.
डॉ. अनिल बोंडे, आमदार,भाजप मोर्शी-वरूड मतदारसंघ.
डॉ. सुनील देशमुख, आमदारभाजप, अमरावती मतदारसंघ.
बच्चू कडू, आमदारप्रहार अचलपूर मतदारसंघ.
रवी राणा, आमदारयुवा स्वाभिमान बडनेरा मतदारसंघ.
आनंदराव अडसूळ, खासदार,गटनेते शिवसेना लोकसभा.
राजकारणातील खरे भीष्म पितामह हरपले
जनसामान्यांच्या बळावर दादासाहेबांसारख्या एकट्या माणसाने लोकांच्या मनावर राज्य केले. खऱ्या अर्थाने दादासाहेब म्हणजे राजकारणातील भीष्म पितामह होते. अमरावतीच्या इतिहासातील एक थोर राजकीय व्यक्तिमत्त्व होत.
संघर्षमय पिढीतले मोठे नेतृत्व होते दादासाहेब
राजकारणाच्या एका संघर्षमय पिढीतले मोठे नेतृत्व म्हणजे दादासाहेब गवई होत. मागासवर्गीयांचे प्रश्न अतिशय संतुलितपणे मांडणारे नेतृत्व आज आपल्यामध्ये नाही. यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.
ज्येष्ठ मार्गदर्शक,मोठ्या नेतृत्वाला आम्ही मुकलो
राजकीय जीवनात दादासाहेब आमच्याकरिता प्रेरणास्थान ठरले. गवई साहेबांच्या आणि आमच्या कुटुंबाचे आजोबांपासूनचे अत्यंत नजीकचे संबंध होते. आयुष्यभर सतत सर्वच समाजाकरिता झटणाऱ्या एका मोठ्या नेतृत्वाला आम्ही आज मुकलो आहोत.
शिक्षणाच्या माहेरघराचा निर्मितीकार विसावला
दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथून शिक्षणाची गंगोत्री निर्माण करून हा जिल्हा खऱ्या अर्थाने शिक्षणाचे माहेरघर करण्यात दादासाहेबांचा मोठा वाटा आहे. दारापूरच्या या नेतृत्वाने जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवला. एक मोठे नेतृत्व आज हरपले.
अमरावती जिल्ह्याचे पालकत्व हरवले
सर्व समाजांना समानतेने वागणूक देणारे आणि लोकप्रिय असलेले नेते दादासाहेब गवई आपल्यातून निघून गेले. बहुजनांकरिता आणि दलितांचा एक मोठा आधार हरपला. दादासाहेबांच्या निधनामुळे अमरावती जिल्ह्याचे पालकत्व आता हरवले आहे.
दादासाहेबांच्या नावे अमरावतीची ओळख
दादासाहेब गवई हे देशपातळीवरचे एक मोठे आणि अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने जिल्ह्याची ओळख निर्माण झाली. सर्वच समाजाला बरोबरीने घेऊन चालणारे नेते म्हणून दादासाहेबांची प्रतिमा निर्माण झाली होती.
अमरावतीच्या नेत्याचा होता दिल्लीत दबदबा
दादासाहेब हे जिल्ह्याचे भूषण होते. अमरावती येथून राजकारणाला सुरुवात करून दिल्लीत दादासाहेबांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अमरावतीच्या नेत्याने राष्ट्रीयस्तरावर नेतेपद भूषवले. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले.
सर्वच समाजातील जनतेची मोठी हानी
मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ज्यांनी अतोनात मेहनत केली असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे एक मोठे नेतृत्व म्हणजे रा. सू. उर्फ दादासाहेब गवई होत. गवई यांच्या निधनाने सर्वच समाजातील जनतेची मोठी हानी झाली आहे.