आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुडच्या मंडीत पसरली सडक्या संत्रींची दुर्गंधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - देशातील विविध बाजारपेठांमध्ये संत्र्यांची निर्यात करणारी येथील संत्रा बाजारपेठ मात्र, सडक्या संत्र्यांमुळे घाणीच्या विळख्यात सापडली आहे. तणस सडलेले संत्री नाल्यांमध्ये पडल्याने जागोजागी नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी, संत्रा मंडीमध्ये काम करणारे कामगार, वाहतूकदार, शेतकरी, व्यावसायिक आदींचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या संत्रा मंडीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यात यंदा संत्र्याचे भरघोस पीक आले. परंतु, योग्य भाव मिळाल्यामुळे संत्र्याची निर्यात झाली नाही. व्यापाऱ्यांनीही संत्राची उचल करण्याकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च संत्री विकण्यासाठी येथील बाजारपेठेत आणलीत. परप्रांतातील बाजारपेठेत संत्रा विक्रीला नेण्यासाठी पेट्या भरल्या जात आहे. परंतु, त्यामध्ये जी संत्रा फळे आकाराने छोटी आहेत, ती तेथेच टाकून देण्यात येत आहेत. त्यामुळे अनावश्यक फळांचा खच संत्रा मंडी परिसरात सर्वत्र विखुरलेला दिसून येत आहे.

संत्रा मंडी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत असून, याची देखभाल स्वच्छतेची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु, बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. टाकलेली संत्रा फळे उचलली गेल्यामुळे जागेवरच सडू लागली आहेत. सडलेल्या कुजलेल्या संत्र्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, येथे काम करणारे व्यापारी, हमाल, वाहतूकदार, शेतकरी परिसरातील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नाल्याही तुंबल्या : संत्रामंडीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था आहे. परंतु, संत्र्याची पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे तणस संत्री नाल्यांमध्ये पडल्यामुळे त्याही चाेकअप झाल्या आहेत. दुसरीकडे नाल्यांची स्वच्छता करण्यात आल्यामुळे झुडपं वाढू लागली आहेत.

सुरक्षा रक्षकासह पथदिवेही नाही : दिवसरात्रचालणाऱ्या या संत्रा मंडीमध्ये प्रकाशाचीही व्यवस्था नाही. करोडाे रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजार समितीमध्ये साधी पोलिस चौकी किंवा सुरक्षेकरिता पोलिसही नाहीत. एकंदरीत ही बाजारपेठ प्रशासकीय अनास्थेची शिकार झाल्याचे दिसून येत आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया धोक्यात : रसाळआपल्या विशिष्ट गोडीमुळे देश-विदेशात येथील संत्र्याला पूर्वीपासूनच मोठी मागणी आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून संत्रा बगांना सिंचनाची सुविधा मिळत नसल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया आज धोक्यात आला आहे.

रोज ट्रॅक्टरने उचलतो सडकी संत्री
^कृषी उत्पन्नबाजार समितीच्या वतीने दररोज एक ट्रॅक्टर भरून सडलेली संत्री उचलून बाहेर फेकली जात आहेत. शेतकऱ्यांचा माल आहे, तोपर्यंत कृउबासची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी माल खरेदी केल्यानंतर ती व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे. नंदकिशोर बोडखे, सचिव,कृउबास,वरुड.

तक्रार देऊनही कार्यवाही नाही
^गेल्या एकमहिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला याबाबत लेखी तक्रार दिली. मात्र, त्यांनी अद्यापही यावर तोडगा काढला नाही. येथे येणाऱ्या प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही अनुचित घडल्यास कृउबास त्याला जबाबदार राहील. विशाल बिऱ्हाडे, तालुकाकृषी अधिकारी.

हमाल रुमाल बांधून करतात काम
^संत्रामंडी परिसरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती काम करणारे मजूर नाक तोंडाला रुमाल बांधून दिसतात. सडकी संत्री तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. िवजय देवघरे, शेतकरी.

आरोग्यावर होतोय परिणाम
^संत्रामंडीला लागूनच कृषी कार्यालय आहे. दररोज येथे ये-जा करावी लागे. परंतु, सडलेल्या संत्रीच्या दुर्गंधीमुळे येथे उभे राहणेही शक्य होत नाही. आरोग्यावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. रामहरी थोटे, शेतकरी.