आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Teachers Co operative Bank Elections

निवडणुकीचा प्रचार शिगेला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. नामांकन दाखल करण्यात आल्यानंतर सर्वच उमेदवार प्रचाराला भिडले असून, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कार्य सर्व पॅनल्सकडून केले जात आहे. पॅनलमधील उमेदवार निश्चित झाल्याने बँकेवर एकहाती सत्ता मिळावी, म्हणून शिक्षक नेते मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

शिक्षक बँकेचे मतदानसंघ क्षेत्र मोठे असल्याने या निवडणुकीत प्रगती, समता, युवा शक्ती परिवर्तन आदी पॅनल्सचे उमेदवार भाग्य आजमावत आहे. या निवडणुकीत हजार ९५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये शिक्षक मतदारसंघातून ६,६१६, तर जिल्हा परिषद कर्मचारी मतदारसंघातून १,३३९ कर्मचारी मतदार आहेत. जिल्हा उपनिबंधकांकडून अंतिम मतदार यादीला मंजुरी दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.

ते ऑक्टोबरदरम्यान नामांकन प्रक्रिया राबवण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी ते २३ ऑक्टाेबरदरम्यान मुदत देण्यात आली आहे, तर नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार असून, नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा प्रगती पॅनलमध्ये समावेश आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राइब शिक्षक संघटना, म. रा. पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सभा, म. रा. उर्दू पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, जि. प. कर्मचारी संघटना, हेल्थ एम्प्लाइज फेडरेशन, अ. भा. एस. सी.- एस. टी. कर्मचारी परिसंघ आदी संघटनांचा समता पॅनलमध्ये समावेश आहे. याशिवाय युवा शक्ती परिवर्तन पॅनलदेखील मैदानात आहे. उपनिबंधक यांच्या आदर्श उपविधीनुसार २१ संचालक मंडळाकरिता निवडणूक घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व साधारण मतदारसंघातून १५, तर शिक्षकेतर कर्मचारी, इतर मागासवर्ग (ओबीसी) १, अनुसूचित जमाती (एस.टी.) १, अनुसूचित जाती (एस.सी.) महिला राखीव २, असे २१ संचालक राहणार आहेत.

युवाशक्ती पॅनलचे उमेदवार
सुरेंद्रमेटे, डी. यू. गावंडे, लक्ष्मीकांत देशमुख, मकरंद खेडकर, मनोज चौरपगार, सूरज मंडे, राजकुमार खर्चान, मनीष काळे, संजय बाबरे, प्रकाश घाटे, प्रशांत पाचपोर, राजेंद्र काळे, दिलीप जावरकर, दिनेश साबळे, गोविंद मुंडे, किशाेर पाटील, दिलीप खंडारे, प्रतिभा अर्डक, सुनीता लहाने यांचा समावेश आहे.

समता पॅनलचे उमेदवार :
रामदासकडू, किरण पाटील, अनिल देशमुख, किशोर मुंदे, शरद काळे, अरविंद बनसोड, कैलाश कडू, गजानन खोपे, उमेश गोदे, राजेंद्र होले, मो. नाजीम अ. गफ्फार, नीळकंठ यावले, राजेंद्र गावंडे, धनंजय अडोकार, रामेश्वर खंडारे, भीमराव वसूकर, रवींद्र निंघोट, राजपाल वानखडे, ज्योती उभाड, मंजूषा कोरडे, सुरेंद्रसिंग गैलवार यांचा समावेश आहे.

प्रगती पॅनलचे उमेदवार :
गोकुलदासराऊत, विलास देशमुख, विजय देशमुख, संजय भेले, मनोज ओळंबे, अजयानंद पवार, राजीक हुसैन, विजय पुसलेकर, प्रमोद ठाकरे, रामदास भाग्यवंत, नामदेव ठाकरे, छाेटूसिंग साेमवंशी, प्रफुल्ल शेंडे, शैलेश चौकसे, सुदाम राठोड, सुनील केने, अनिल कोल्हे, मधुकर चव्हाण, अर्चना सावरकर, वैशाली जवंजाळ, ज्ञानेश्वर घाटे यांचा समावेश आहे.

शाळांमध्ये उमेदवार :
जिल्हापरिषद शिक्षक बँकेचे मतदार हे शिक्षक जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे शाळा-शाळांपर्यंत पोहोचण्याचे कार्य उमेदवारांकडून होत आहे. प्रगती, समता, युवा शक्ती परिवर्तन पॅनलकडून प्रत्येक शाळेत शिक्षकांना भेटी दिल्या जात आहे. मतदानासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने प्रचाराची धूमदेखील वाढली आहे.