आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इर्विन’ने टाकली कात, रुग्ण नातेवाईकांकडून प्रशासनाला सहकार्याची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नाव घेताच चटकन डोळ्यासमोर उभे राहते ते ,जागोजागी पडलेला कचरा, गुटखा, तंबाखू आणि पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती अन् आरोग्य बिघडवणाऱ्या दुर्गंधीयुक्त वातावरणाचे चित्र.
मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची भिस्त असलेल्या शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालया(इर्विन)ने गेल्या काही दिवसांत पूर्णपणे कात टाकली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षापासून सर्वच वॉर्डांचे नूतनीकरण झाल्याने साफसफाई स्वच्छता बघायला मिळत आहे.

रुग्णालयातील आल्हाददायक वातावरणामुळे मन प्रसन्न राहत असल्याच्या प्रतिक्रिया खुद्द रुग्णांनी त्यांच्या समावेत असलेल्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी इर्विन रुग्णालयात जायचे म्हटले की नागरिकांच्या अंगावर अक्षरश: काटे यायचे. त्याला रुग्णालयातील दुर्गंधी, अस्वच्छता कोंदट वातावरण कारणीभूत होते. परंतु, इर्विन रुग्णालयाने सध्या नूतनीकरणाचा शालू परिधान केल्याने या रुग्णालयाबद्दल नागरिकांच्या मनात असलेली पूर्वीची वाईट प्रतिमा रुग्णालयात आल्यावर सपसेल खोटी ठरत आहे.

एनआरसीचेसेंटर होणार : मेळघाटातीलकुपोषणावर मात करण्यासाठी रुग्णालयात एनआरसी (न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर) येत्या काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी सध्या जागा उपलब्ध नसून जागेचा शोध घेण्यात येत आहे. परंतु, कुठल्याही एका वॉर्डात हे सेंटर तत्काळ सुरू केले जाईल, असे सिव्हिल सर्जन यांनी सांगितले.

या सेंटरमध्ये कुपोषित मुलांना कुपोषणातून बाहेर काढून त्यांचे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाईल. या सेंटरमध्ये एक न्यूट्रिशियन, मुलाच्या आई-वडिलांची राहण्याची व्यवस्था आणि मुलाच्या पालकांना काही पैसे देऊन त्यांच्या मुलांचा योग्य सांभाळ केला जाईल. लवकरच हे सेंटर सुरू होईल, असे सीएसने नमूद केले.

नागरिकांंनी बदलावी मानसिकता
रुग्णालयेकिंवा इतर सार्वजनिक ठिकाणे खराब करणारे, स्वच्छता नाही म्हणूनही आेरड करणारेही नागरिकच असतात. त्यामुळे रुग्णालय स्वच्छ, नीटनेटके साफ ठेवणे जितकी रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे तेवढीच किंबहुना अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची आहे. सफाई कामगारांकडून दिवसातून दोन वेळा साफसफाई होते. परंतु रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला तर रुग्णालयात नेहमी स्वच्छता नांदेल.

पुढे काय?
रुग्णालय हे स्वच्छ नीटनेटके ठेवण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुठेही थुंकणे, कुठेही कचरा फेकणे, कुठेही जेवायला बसणे, कुठेही प्रसाधनचा वापर करणे आणि घाण करणे आदी गोष्टी नागरिकांनी टाळल्यास सदैव रुग्णालयात चकचकाट दिसेल. आल्हाददायक वातावरणामुळे रुग्णदेखील लवकर बरा हाेईल, असे खुद्द डॉक्टरांनीच सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयासह सर्वच वॉर्डाचे नूतनीकरण झाल्याने रुग्ण सुखावले आहेत.

रुग्णांच्या सोयींना प्राधान्य
नूतनीकरणातशल्यचिकित्सक वॉर्डाचा प्रस्ताव राहिलाच होता. पण, सध्या ऑपरेशन थिएटर वॉर्डाचा प्रस्ताव नव्याने तयार करून पाठवला आहे. त्यामुळे लवकरच आेटीचेही नूतनीकरण होणार आहे. याशिवाय सिटीस्कॅन आणि अपुऱ्या मनुष्यबळासाठीही पाठपुरावा सुरू आहे. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परिसर स्वच्छतेसाठी फलकही लावले असून,त्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांमध्येही जाणवत आहे. डॉ.अरुण राऊत, सिव्हिल सर्जन,जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती.