आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील सहाशे खासगी शाळांचा "बंद' मध्ये सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संस्थाचालकांकडून पुकारण्यात आलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तब्बल ६०० पेक्षा जास्त खासगी शाळा अाज (९ डिसेंबर) बंद होत्या. संस्थाचालकांकडून संप पुकारण्यात येत असल्याने शाळांकडून यापूर्वीच दोन दिवस शाळा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना कळवण्यात आले होते. संपामुळे खासगी शाळा ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीकडून विविध समस्यांना घेऊन या संपाची हाक दिली होती.शासनाकडून अनुदान मिळणार असले तरी अनेक बाबतीत त्यांची अडवणूक करण्यात येणार आहे. शिक्षण संस्थेमधील शिक्षक कर्मचाऱ्यांची पद भरतीदेखील शासनाकडून केली जाणार आहे. शिवाय मागील अनेक वर्षांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित असल्याची देखील माहिती आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्र हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बाधित झाल्याची खासगी संस्थाचालकांची भावना आहे. याचा दुरगामी दुष्परिणाम विद्यार्थी, पालक सर्व घटकांच्या भावी पिढीला भाेगावा लागण्याची शक्यता आहे. खासगी शिक्षण संस्थांची स्वायतत्ता कायम ठेवणे, शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंध समितीचा अहवाल त्वरित मान्य करणे, कला क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करणे, २८ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करणे, शाळेत ग्रंथपाल प्रयोगशाळा परिचर पद कायम ठेवणे, पेन्शन योजना लागू करणे, अशा अनेकविध मागण्यांसाठी हा संप केल्या जात आहे. वेळ पडल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे शिक्षण बचाव कृती समितीने इशारा दिला आहे. जिल्ह्यात या आंदोलनाचे नेतृत्व कांचनमाला गावंडे, डॉ. मेघश्याम करडे, आर. बी. कळस्कर, महेंद्र सोमवंशी, अशोक चोपडे, केशव पाटील, पी. आर. पाटील, नितीन चवाळे, मधुकर अभ्यंकर आदी करत आहे.

शाळांना दोन दिवस सुटी
जिल्ह्यातखासगी शिक्षण संस्थांकडून जवळपास ६५० शाळा चालवल्या जातात. संपामध्ये तब्बल ९० टक्के शाळेतील शिक्षक, कर्मचारी सहभागी झालेत. शाळेत कोणीच नसल्याने विद्यार्थ्यांना १० डिसेंबरला शाळेत येण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. गुरुवार १० डिसेंबरला देखील शाळा भरणार नसल्याने विद्यार्थ्यांची किलबिल राहणार नाही.
बुधवारी शहरातील खासगी शाळा बंद असल्याने शाळा अशा अोस पडल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...