आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १९ जणांना चावा, घाटलाडकी गावात दहशतीचे वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटलाडकी- पिसाळलेल्या एका कुत्र्याने गेल्या दोन दिवसांपासून परिसरामध्ये हैदोस घातला आहे. आतापर्यंत त्याने १९ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावी,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
रविवारपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावामध्ये हैदोस घातला असून, लहान-मोठ्या अशा जवळपास १९ जणांना त्याने चावा घेतला आहे. गावालगत असलेल्या बेलमंडळी, देवीनगर या गावांतही या कुत्र्याने दहशत पसरवली आहे. ग्रामस्थांकडून कुत्र्याला मारण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि. १०) एका कुत्र्याला मारण्यात आले. परंतु, तो दुसराच असल्याचे निष्पन्न झाले.
अँटीरॅबीज लस उपलब्ध आहे : ओपीडीच्या वेळेत रुग्णांना लसीकरण केले जाते. अँटी रेबीज लस आमच्याकडे उपलब्ध आहे. सोमवारी १३ जणांना अँटी रेबीज लस देण्यात आली, असे चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखडे यांनी सांगितले.

लवकरच बंदोबस्त करण्यात येईल
- मलाया विषयी काहीही माहिती नव्हती. सोमवारी दुपारी एक कुत्रा मारण्यात आल्याचे समजले. पिसाळलेल्या कुत्र्याचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल.
अशोक उईके, सरपंच.
अमरावती येथेही लस उपलब्ध नाही
- मुलाला या पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी चावले. त्याची हालत पाहता त्याला मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांनी अँन्टी रॅबिज लस दिली. मात्र दुसरी एक लस उपलब्ध नसल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवले. तेथेही ती लस उपलब्ध होऊ शकली नाही.
शाबीर शाह, नागरिक.