आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप दिसताच सर्पमित्रांना बोलवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - थंडढगाळ वातावरण आणि पावसाळ्यात हमखास साप िनघतो. साप बघितला की सर्वसामान्य घाबरतात. अशावेळी घाबरून जाता यंग स्नेक फ्रेंड सोसायटीच्या सदस्यांना फोन करून बोलवा, असे आवाहन सर्पमित्र संघटनेद्वारे करण्यात आले आहे. अशीच घटना महादेवखोरी येथे घडली. पवन राऊत यांच्या घरी साप िनघाला तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली होती. मग त्यांच्या आईने सर्पमित्रांना फोन केला. यंग स्नेक फ्रेंडचे सदस्य राजेंद्र पारखे यांनी मयुर वर्मा रामाभाऊ राऊत यांच्या मदतीने साप पकडून निर्जन ठिकाणी सोडून िदला.

हा साप विषारी होता. या फुरसे श्रेणीतील सापाचे शास्त्रीय नाव स्वाॅ स्किल्ड वायपर (वायफरापीडी फॅमेली)असे आहे. पाल, सरडे, विंचू हे त्याचे खाद्य आहे. त्याची लांबी एक फूट चार इंच होती. या प्रजातीच्या सापाची जास्तीत जास्त लांबी दोन फूट सहा इंच असते. मादी एप्रिल ते आॅगस्ट दरम्यान चार ते आठ पिल्लांना जन्म देते. ती आठ ते १२ सेंमी. लांबीची असतात.

हा साप डिवचला गेला असता शरीराचे वाटोळे करून खवले एकमेकांवर घासतो, आणि करवतीसारखा आवाज करतो. अशा जैव विविधतेचे संरक्षण करायला हवे. ते निसर्गाचा समतोल साधण्यासाठी मनुष्याला मदत करीत असतात, असे आवाहन यंग स्नेक फ्रेंड सोसायटीचे अध्यक्ष अवि येते यांनी केले आहे.