आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परिवर्तन’च्या विजयाचे संकेत, डाॅ. पंजाबराव देशमुख अर्बन बँक निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डाॅ.पंजाबराव देशमुख अर्बन बँक निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले, त्या वेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक संजय वानखडे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलच्या १७ ही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी डाॅ. पंजाबराव देशमुख पॅनल प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सरासरी १,५०० मतांनी मागे टाकल्यामुळे ‘परिवर्तन’च्या विजयाचे संकेत मिळत होते. त्यामुळे पॅनलच्या समर्थकांनी उत्साहात फटाक्यांची आतषबाजीही सुरू केली होती.

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हाॅलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांच्या नेतृत्वात सकाळी वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पहिल्या फेरीचे चित्र स्पष्ट झाले. यात परिवर्तन पॅनलचे १७ ही उमेदवार आघाडीवर होते. रात्री १०.३० च्या सुमारास दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतर मताधिक्य आणखी वाढले. त्यामुळे परिवर्तन पॅनलचा विजय जवळ-जवळ निश्चित समजला जात होता. संजय वानखडे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल (कपबशी), बी. टी. गावंडे राजेंद्र गायगोले यांच्या नेतृत्वातील डाॅ. पंजाबराव देशमुख पॅनल (पतंग) आणि डाॅ. वसंत लव्हणकर यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलमध्ये (विमान) तिहेरी लढत होती. मात्र, बँकेच्या संचालकपदासाठी झालेल्या या निवडणुकीत बँकेला विकासासोबतच आधुनिकतेकडे नेण्यास कटिबद्ध असलेल्या पॅनलच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याची परिसरात चर्चा होती.

परिवर्तनला कौल
¾सर्वसाधारणमतदारसंघ(८ संचालक)
१.डाॅ. बाळकृष्ण अढाऊ : २००५ मते
२. डाॅ. रवींद्र कडू : ४,६६४ मते
३. प्रशांत डवरे : ५,४५७ मते
४. प्रा. अभय ढोबळे : ४,५०७ मते
५. प्रा. हेमंत देशमुख : ४,५४१ मते
६. आेंकार बंड : ४,२८२ मते
७. राजेंद्र महल्ले : ४,७३८ मते
८. सुरेश शिंगणे : ४,६७१ मते
¾रहिवासीमतदारसंघ (२५ कि.मी. दूर)
९.शरद अढाऊ : ५,४८७ मते
१०. दिलीप कोकाटे : ४,६५७ मते
११. गिरीश भारसाकळे : ४,६७० मते
१२. अशोक वडस्कर :४५५८ मते

¾इतरमागासवर्गीय जातीचे उमेदवार
१३.संजय वानखडे : ५,८५९ मते
¾अनुसूचितजातीचे उमेदवार
१४.डाॅ. संजय खडसे : ५,६०२ मते
¾विमुक्तभटक्या जमातीचे उमेदवार
१५.डाॅ. सुनील लव्हाळे : ४,८८२ मते

¾महिला उमेदवार
१६.डाॅ. अंजली ठाकरे : ५,३०७ मते
१७. शोभना भुईभार : ४,८५५ मते