आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नागोबा’ नालीतून निघाला अन् तडक घराकडे पळाला, नागोबा अंगात आल्याची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- अंगातसंचारलेला ‘नागोबा’ वाट मिळेल तिकडे सरपटत गेला. त्यातच तो एका अरुंद नालीत अडकला. जीवाचा आकांत करूनही या ‘नागोबा’ला नालीतून बाहेर पडता आले नाही. अखेर जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करून या ‘नागोबा’ला सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र हा ‘नागोबा’ उठला अन् त्याने थेट घराचीच वाट धरली. ही घटना शहरातील गांधी चौक परिसरात बुधवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास घडली.
नागोबा अंगात आल्याचे सोंग घेऊन राजेश सोनटक्के (४५) हा युवक गांधी नगर परिसरातील नालीत घुसला. मात्र नालीचे दुसरे टोक अरुंद असल्यामुळे त्याला त्यातून बाहेर पडता येईना. नागोबाला पहाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी गेली. मात्र नालीतून बाहेर पडता येत नसल्यामुळे राजेशची चांगलीच पंचाईत झाली. बघ्यांची गर्दी वाढू लागली.
यंत्रांची घेतली मदत : नागपंचमीच्यादिवशी नालीत गेलेल्या या नागोबाला बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न कामी आल्याने अखेर त्याला बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचीच मदत घेण्यात आली.

नागोबा अंगात आल्याची चर्चा : नागोबाअंगात आल्याने राजेश नालीत घुसला अशी चर्चा होती. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजेशला नालीतून बाहेर काढल्याने काहींच्या चेहऱ्यावर जीव वाचवल्याचे समाधान, तर काहींच्या चेहऱ्यावर मुर्ख बनल्याचे दु:ख दिसत होते.
नालीत अडकलेला राजेश सोनटक्के